गार्ड बुथला कारची धडक

By Admin | Updated: March 26, 2016 01:38 IST2016-03-26T01:38:46+5:302016-03-26T01:38:46+5:30

येथील आंतरराज्यीय सीमा तपासणी नाक्यावर कार्यरत असणाऱ्या गार्डच्या बुथला छत्तीसगडच्या एका भरधाव कारने धडक दिली.

The Guard Booth Car Strike | गार्ड बुथला कारची धडक

गार्ड बुथला कारची धडक

शिरपूरबांध : येथील आंतरराज्यीय सीमा तपासणी नाक्यावर कार्यरत असणाऱ्या गार्डच्या बुथला छत्तीसगडच्या एका भरधाव कारने धडक दिली. यात बूथ तुटला असला तरी तिथे कार्यरत तीन गार्ड थोडक्यात बचावले. हा अपघात पहाटे ५.३० च्या सुमारास घडला. सदर कार (सीजे ०४, एलई ७७९९) गार्ड बुथवर आदळली त्यावेळी तिथे उमेश कोरे, आनंदराव मेंढे व देवा कोसरकर हे गार्ड ड्युटीवर होते. मात्र कोसरकर यांना किरकोळ दुखापत वगळता कोणीही जखमी झाले नाही. या ठिकाणी गार्डच्या सुरक्षेसाठी सुरक्षित बुथ नसल्यामुळे कधीही मोठा अपघात होऊ शकतो.

Web Title: The Guard Booth Car Strike