शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या गर्दीने धोका वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 05:00 IST

अनलॉक अंतर्गत राज्य शासनाकडून आता सर्वच काही उघडण्यात येत आहे. परिणामी जनजीवन पूर्ववत होत चालले असून लोकांचे घराबाहेर निघण्याचे प्रमाण वाढले आहे. हेच कारण आहे की, आता लोकांच्या मनातून कोरोनाची भीती कमी होत चालली आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. राज्य शासनाकडूनच सुट दिली जात असल्याने नागरिकही ठरवून दिलेल्या काही अटी-शर्तींना विसरून मोकाट वागत आहेत.

ठळक मुद्देकोरोना रूग्ण संख्येत वाढ : गर्दी टाळणे झाले गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नवरात्रोत्सवामुळे एकीकडे गर्दी वाढत असतानाच आता कोरोनाचाही धोका वाढू लागला आहे. ऑक्टोबर महिन्यात कोरोना रूग्ण संख्या नियंत्रणात असतानाच मागील ४ दिवसांपासून मात्र पुन्हा रूग्ण संख्या वाढत असल्याचे दिसत आहे. यामुळे वाढती गर्दी धोकादायक ठरत असल्याचे दिसत आहे. अशात गर्दी टाळणे व आवश्यक त्या उपाययोजनांचे पालन करणे अत्यावश्यक झाले आहे.अनलॉक अंतर्गत राज्य शासनाकडून आता सर्वच काही उघडण्यात येत आहे. परिणामी जनजीवन पूर्ववत होत चालले असून लोकांचे घराबाहेर निघण्याचे प्रमाण वाढले आहे. हेच कारण आहे की, आता लोकांच्या मनातून कोरोनाची भीती कमी होत चालली आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. राज्य शासनाकडूनच सुट दिली जात असल्याने नागरिकही ठरवून दिलेल्या काही अटी-शर्तींना विसरून मोकाट वागत आहेत.परिणामी कोरोनाचा कहर आहे तसाच दिसून येत असून झपाटया रूग्ण संख्या वाढत चालली आहे.जिल्ह्यातील चित्र बघता आजघडीला ८३९७ एवढी कोरोना रूग्ण संख्या झाली असून जिल्ह्यात ७७६ क्रियाशील रूग्ण आहेत. दिलासादायक बाब म्हणजे, ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत कोरोना रूग्ण संख्या नियंत्रणात होती. त्यातही कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या दुपटीने जास्त असल्याने क्रियाशील रूग्णांची संख्या झपाटयाने कमी झाली आहे.मात्र आता नवरात्रोत्सवाला सुरूवात झाली असून त्यामुळे बाजारपेठेत गर्दी वाढू लागली आहे. हेच कारण आहे की, कोरोना जिल्ह्यात पुन्हा आपले पाय पसरत असल्याने मागील ४ दिवसांपासून दिसून येत आहे.ही स्थिती बघता उत्सवाच्या भरात होणारी गर्दी धोकादायक ठरणार असल्याचे दिसत आहे. असे झाल्यास सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात निर्माण झालेली स्थिती पुन्हा निर्माण होणार यात शंका वाटत नाही. करिता आता गर्दी टाळणे अत्यावश्यक झाले आहे. शिवाय शासनाने ठरवून दिलेल्या उपाययोजनांचे पालन करणे फायद्याचे ठरणार आहे.जिल्ह्यातील नवरात्रोत्सवाची दूरवर ख्याती आहे. हेच कारण आहे की, शहरातील बाजारपेठ नवरात्रोत्सवाच्या साहित्यांनी सजली आहे. या साहित्यांची खरेदी करण्यासाठी नागरिकांची चांगलीच गर्दी आता बाजारपेठेत दिसून येत आहे. अशात फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचा व सॅनिटायजरचा वापर याकडे दुर्लक्षही होत आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या