ग्रामपंचायतचा वाजला बिगुल, आता झेडपीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 05:00 AM2020-12-13T05:00:00+5:302020-12-13T05:00:06+5:30

जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी आणि सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ १५ जुलैला संपला मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. त्यामुळे मागील सहा महिन्यांपासून जिल्हा परिषद आणि प्रशासकराज सुरु आहे. वीस दिवसांपूर्वीच राज्य निवडणूक आयोगाने जि.प.च्या सर्कल निहाय आरक्षणावर आक्षेपाची प्रक्रिया पूर्ण केली. त्यामुळे आता जिल्हा परिषदेची निवडणूक सुध्दा लवकरच जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Gram Panchayat's bell rings, now waiting for ZP | ग्रामपंचायतचा वाजला बिगुल, आता झेडपीची प्रतीक्षा

ग्रामपंचायतचा वाजला बिगुल, आता झेडपीची प्रतीक्षा

googlenewsNext
ठळक मुद्देतालुक्यात सर्वाधिक ग्रा.पं.ची निवडणूक : मोर्चेबांधणीला झाली सुरुवात

n  लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राज्य निवडणूक आयोगाने मुदत पूर्ण झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर शुक्रवारी जाहीर केला. यातंर्गत जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे. मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा सुध्दा कार्यकाळ ६ महिन्यापूर्वीच संपला असून आता त्यांच्या निवडणुका केव्हा जाहीर होतात याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे. 
जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी आणि सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ १५ जुलैला संपला मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. त्यामुळे मागील सहा महिन्यांपासून जिल्हा परिषद आणि प्रशासकराज सुरु आहे. वीस दिवसांपूर्वीच राज्य निवडणूक आयोगाने जि.प.च्या सर्कल निहाय आरक्षणावर आक्षेपाची प्रक्रिया पूर्ण केली. त्यामुळे आता जिल्हा परिषदेची निवडणूक सुध्दा लवकरच जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याच दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळविला आहे. 
सभा, बैठका आणि कार्यक्रमाच्या माध्यमातून जनसंपर्क वाढविण्यास सुरुवात केली आहे. तर नेत्यांचे दौरे सुध्दा वाढले असून निवडणुकीसाठी सज्ज राहण्यास पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सांगितले जात आहे. त्यातच आता ग्रामपंचायतच्या निवडणुका जाहीर झाल्ल्याने यात अजून रंगत वाढली आहे. जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर झाल्यास दोन्ही निवडणुकीच्या निमित्ताने गुलाबी थंडीत राजकीय वातावरण मात्र तापणार असल्याचे चित्र आहे. 
ग्रामपंचायत ही राजकारणातील प्रवेशाची पहिली पायरी असून येथूनच पुढील राजकीय वाटचालीला सुरुवात होते. शिवाय १४ व्या वित्त आयाेगामुळे ग्रामपंचायतींचे महत्व सुध्दा वाढले आहे. त्यामुळे यासाठी अनेकांनी गुडघ्याला बांशिग आधीपासून बांधून ठेवले आहे. 
 ग्रामीण भागावर पकड मजबूत करण्याचा प्रयत्न 
ग्रामपंचायत ही गाव विकासाचा कणा असते शिवाय यात स्थानिकांचा थेट संपर्क येतो. याच माध्यमातून ग्रामीण भागावर पकड मजबूत करुन पुढील इतर निवडणुकांचे गड सर करणे शक्य होत असते. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. ग्रामपंचायतच्या निवडणुका या कुठल्या पक्षाच्या चिन्हाखाली लढविल्या जात नसल्यातरी अप्रत्यक्षपणे त्यावर कुठल्या ना कुठल्या राजकीय पक्षाचा पगडा असतोच. 
 

Web Title: Gram Panchayat's bell rings, now waiting for ZP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.