शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

शासनाला दीड कोटीचा भुर्दंड

By admin | Updated: March 10, 2016 02:25 IST

ग्राम पंचायत स्तरावर डाटा एन्ट्री आॅपरेटरचे काम करणाऱ्या लोकांचे वेतन महाआॅनलाईन या कंपनी मार्फत करण्यात येते.

गोंदिया : ग्राम पंचायत स्तरावर डाटा एन्ट्री आॅपरेटरचे काम करणाऱ्या लोकांचे वेतन महाआॅनलाईन या कंपनी मार्फत करण्यात येते. शासनाने मनुष्य बळाच्या सेवेवर १० टक्के टिडीएस कपात करण्याचे शासनाचे १७ एप्रिल २०१२ रोजीचे पत्र असताना जिल्हा परिषदेच्या वित्त व मुख्य लेखा अधिकाऱ्यांनी १० टक्के टीडीएस न कापता फक्त २ टक्केच टिडीएस कापून सन २०१५ च्या वर्षभरातील एक कोटी ४९ लाख १० हजार ७६ रूपयाचा भूर्दंड शासनाला बसविला आहे. त्यामुळे एवढी रक्कम महाआॅनलाईनकडून जिल्हा परिषद कधी काढणार हा प्रश्न आहे.ग्राम पंचायत येथे डाटा एन्ट्री आॅपरेटर म्हणून काम करणाऱ्या लोकांचे सेवेसाठी १० टक्के रक्कम कपात करण्याचे शासनाचे आदेश असतांना या आदेशाला धाब्यावर बसवून मुख्य वित्त लेखा अधिकारी रा. मा. चव्हाण यांनी फक्त २ टक्के टीडीएस कपात करून त्यांना पैसे दिले आहेत. दिलेल्या वेतनाची प्रक्रिया लिपीक, सहाय्यक वित्त अधिकारी यांच्या मार्फत न होता. मुख्य वित्त लो अधिकाऱ्यांनी स्वत:च केल्याचे त्या बिलांवर इतर अधिकारी कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या नाहीत असे कळते. जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागामार्फत नुकतेच नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्याचे वेतन देण्यात आले.नोव्हेंबर महिल्यात ६६ हजार ६८६ तर डिसेंबर महिन्याचा टीडीएस ६९ हजार ३५३ रूपये कपात करून ३३ लाख ९२ हजार २४० रूपये प्रत्येक महिन्यात महाआॅनलाईनला वेतन देण्यात आले. सन २०१० पासून ते डिसेंबर २०१५ या कालावधीतील एक कोटी ४९ लाख १० हजार ७६ रूपये कपात करायला हवे होते. परंतु जि.प.च्या मुख्य वित्त लेखा अधिकाऱ्यांनी १० टक्के रक्कम कपात न करता फक्त २ टक्के रक्कम कपात करून महाआॅनलाईनला पैसे दिले आहेत. (तालुका प्रतिनिधी)पंचायत विभागाने दिले दोन पत्रमहाआॅनलाईचे सन २०१० पासून डिसेंबर २०१५ या काळातील डाटा एन्ट्री आॅपरेटरच्या वेतनातून १० टक्के टीडीएस कापून नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्याचे वेतन द्यावे, असे पत्र ग्राम पंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बागडे यांनी २० फेब्रुवारी २०१६ रोजी दिले. परंतु त्यांच्या पत्रानंतर झालेल्या वेतनातही मुकाअ यांनी फक्त २ टक्के कपात करून २६ फेब्रुवारी रोजी धनादेश दिला. त्यानंतर पुन्हा ३ मार्च रोजी सदर पत्र मुख्य वित्त लेखा अधिकाऱ्यांना देण्यात आला.महाआॅनलाईन कडून २ टक्के टीडीएस कपात करण्यात आले परंतु आणखी ८ टक्के रक्कम म्हणजेच एक कोटी ४९ लाख १० हजार रूपये कपात करायचे आहेत असा पत्र संबधीत अधिकाऱ्यांकडून मुख्य वित्त लो अधिकाऱ्यांना आल्यानंतरही त्यांनी कपात का केली नाही. शासनाच्या नियमांचे पालन करण्यासाठी असलेले अधिकारी नियमांना तुडवत असल्याचे प्रकर्षाने जाणवते.