शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

गोंदियातील सारस होणार ग्लोबल

By admin | Updated: December 19, 2015 01:44 IST

‘सारस फेस्टीवल’अंतर्गत घेण्यात येत असलेल्या राष्ट्रीय फोटो शूट स्पर्धेबाबत जस-जशी माहिती मिळत आहे, ..

फोटोशूट स्पर्धेला प्रारंभ : हौशी छायाचित्रकारांना ओढ, परराज्यातूनही प्रतिसादगोंदिया : ‘सारस फेस्टीवल’अंतर्गत घेण्यात येत असलेल्या राष्ट्रीय फोटो शूट स्पर्धेबाबत जस-जशी माहिती मिळत आहे, तस-तसे हौशी छायाचित्रकारांकडून जिल्हा पर्यटन समितीला फोन येत असून त्याची नोंदणी सुरू झाली आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत भाग घेण्यासाठी परराज्यातील छायाचित्रकारांचाही भरघोस प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे गोंदियातील सारसांचा महिमा केवळ जिल्ह्यापुरता मर्यादित न राहता तो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्याची आशा पल्लवित झाली आहे.जिल्ह्याला लाभलेल्या जल, जंगल व जीव या तिघांचा मेळ घालून या जंगल व जीवसृष्टीचे संवर्धन व रोजगार निर्मितीतून गोंदिया जिल्ह्याची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने वेगवेगळे प्रयोग सुरू केले आहेत. विशेष म्हणजे राज्यात फक्त गोंदिया जिल्हयातच ‘सारस’ हा पक्षी आढळत असल्याने दुर्मिळ सारसांचे सर्वांनाच आकर्षण आहे. सध्याचा काळ हा देशी-विदेशी पक्ष्यांच्या आगमनाचा काळ असल्याने जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनातून जिल्हा पर्यटन समितीकडून ‘सारस फेस्टीवल’चे आयोजन करण्याची कल्पना प्रत्यक्ष साकारण्यात आली.१५ डिसेंबर ते ३१ जानेवारी असा दीड महिन्याचा हा महोत्सव असून जिल्ह्यासह अन्य जिल्हेच नाही तर राज्यांतील छायाचित्रकारांना जिल्ह्यात खेचून आणावे या उद्देशातून फोटो शूट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. देश पातळीवर कुणीही या स्पर्धेत भाग घेऊ शकत असल्याने ही एक राष्ट्रीय फोटोशूट स्पर्धा ठरत आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून तसेच फोटोग्राफर्स आणि सर्वत्र निसर्ग व वन्यजीव संस्थांशी संपर्क साधण्यात आला आहे. तसेच येथील पक्षी, वन्यजीव व निसर्गप्रेमींच्या माध्यमातूनही फोटोग्रासर्फना संपर्क साधला जात आहे. त्यामुळे परराज्यातूनही या स्पर्धेसाठी नोंदणी होत असल्याची माहिती आहे. (शहर प्रतिनिधी)