शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया तालुका होतोय कोरोनाचा हॉटस्पाॅट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 05:00 IST

गुरुवारी (दि.१९) जिल्ह्यात १२५ नवीन कोरोना बाधित रुग्णांची भर पडली. गोंदिया, सडक अर्जुनी आणि तिरोडा तालुक्यातील तीन कोरोना बाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. ५१ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली. गुरुवारी आढळलेल्या १२५ कोरोना बाधितांमध्ये सर्वाधिक ७६ रुग्ण हे गोंदिया तालुक्यातील आहेत. तिरोडा ९, गोरेगाव ३, आमगाव १६, सालेकसा २, देवरी २, सडक अर्जुनी ११, अर्जुनी मोरगाव ५ आणि बाहेरील १ रुग्णाचा समावेश आहे. 

ठळक मुद्देबाधितांची संख्या होतेय पुन्हा तीन अंकी : तीन कोरोना बाधितांचा मृत्यू , नागरिकांनो काळजी घ्या

 लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यातच मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होत असल्याचे चित्र आहे. कोरोना बाधितांची संख्या पुन्हा तीन आकडी होत असून सर्वाधिक रुग्ण हे गोंदिया तालुक्यात आढळत आहे. त्यामुळे हा तालुका पुन्हा कोरोनाचे हॉटस्पाट होत असल्याने शहरवासीयांसह जिल्हावासीयांची चिंता वाढली आहे.गुरुवारी (दि.१९) जिल्ह्यात १२५ नवीन कोरोना बाधित रुग्णांची भर पडली. गोंदिया, सडक अर्जुनी आणि तिरोडा तालुक्यातील तीन कोरोना बाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. ५१ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली. गुरुवारी आढळलेल्या १२५ कोरोना बाधितांमध्ये सर्वाधिक ७६ रुग्ण हे गोंदिया तालुक्यातील आहेत. तिरोडा ९, गोरेगाव ३, आमगाव १६, सालेकसा २, देवरी २, सडक अर्जुनी ११, अर्जुनी मोरगाव ५ आणि बाहेरील १ रुग्णाचा समावेश आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ४२३९४ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ३२१५२ नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. कोरोना बाधित रुग्णांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटीजेन टेस्ट केली जात आहे. आतापर्यंत ४५१५६ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ४०५०४ जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १११४३ कोरोना बाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी १०३१७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर ६७८ कोरोना ॲक्टीव्ह रुग्ण आहेत. ३३८ नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून अद्याप प्राप्त व्हायचा आहे. चाचण्यांचे प्रमाण वाढविलेकोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेत आरोग्य विभागाने कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविले आहे. मागील दोन दिवसांपासून दररोज तीनशे ते चारशे कोरोना चाचण्या केल्या जात आहे. त्यामुळेच रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.९६ टक्के कोरोना बाधितांच्या संख्येत मागील दोन तीन दिवसांपासून वाढ झाली असल्याने जिल्हावासीयांच्या चिंतेत भर पडली असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असल्याने थोडा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचा दर ८९.९६ टक्के आहे तर मृत्यू दर १.१९ टक्के आहे. कोरोना रुग्ण वाढीचा डब्लिंग दर १७८.८ टक्के आहे.  

 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या