शहरं
Join us  
Trending Stories
1
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
2
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
5
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
6
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
7
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
8
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
9
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
10
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
11
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
12
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
13
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
14
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
15
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
16
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
17
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
18
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
19
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
20
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

सचिन, हिराणींना घातली गोंदियाने भुरळ

By admin | Updated: February 11, 2015 01:27 IST

गोंदिया-भंडारा जिल्ह्यासाठी शिक्षणाची दारे उघडणारे मनोहरभाई पटेल यांचा जयंती उत्सव दरवर्षी होणाऱ्या विविध ‘सेलीब्रेटींच्या’ आगमनामुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरत आहे.

गोंदिया : गोंदिया-भंडारा जिल्ह्यासाठी शिक्षणाची दारे उघडणारे मनोहरभाई पटेल यांचा जयंती उत्सव दरवर्षी होणाऱ्या विविध ‘सेलीब्रेटींच्या’ आगमनामुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरत आहे. यावर्षी समस्त भारतीयांच्या लाडक्या सचिनला पाहण्याची आणी त्याचे अनुभव ऐकण्याची संधी मिळाल्याने यावर्षीचा सोहळा गोदियावासीयांसाठी अविस्मरणीय ठरला आहे. याच बरोबर सचिन आणि चित्रपट दिग्दर्शक राजकुमार हिराणींनाही गोंदियाने भुरळ घातल्याचे चित्र पहायला मिळाले. गोंदिया सारख्या राज्याच्या एका टोकावर वसलेल्या आणि नक्षलग्रस्त, आदिवासीबहुल तथा मागास म्हणून गणल्या जाणाऱ्या गोंदियाला मोठ्या सेलीब्रेटंीचे पाय लागने हे सहज शक्य नाही. पण खा. प्रफुल्ल पटेल यांनी शब्द टाकावा आणि तो कुणी नाकारावा हे शक्य नसते. यावेळीही सचिनच्या बाबतीत हाच अनुभव सर्वांना आला. ज्या सचिनला हजारोवेळा केवळ टीव्ही स्क्रीनवर पाहिले त्या सचिनला प्रत्यक्ष आपल्यासमोर बसलेले पाहणे आणि नंतर सचिनने त्याच्या आयुष्यातील अनेक प्रसंग गोंदियावासीयांसोबत ‘शेअर’ करणे हा अनुभव त्या सोहळ्याला उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील अविष्मरणीय क्षण ठरला आहे. यावेळी हजारो चाहत्यांनी दिलेल्या प्रेमाने सचिनही भारावून गेल्याचे दिसून आले. गोंदिया सारख्या छोट्या जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या पटेल यांच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचा परसिर पाहून सचिन ने असे कॉलेज चित्रपटांमध्येच बघायला मिळत असल्याची भावना व्यक्त केली. पुढच्या जन्मी अशाच कॉलेजमध्ये शिकण्याची संधी आपणाला मिळावी असेही तो म्हणाला. बिरसी येथील फ्लार्इंग अ‍ॅकेडमीला त्याने भेट दिली. तेव्हा गोंदिया सारख्या ठिकाणी हे सर्व असल्याचे पाहून आश्चर्य व्यक्त केले. अनेक गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शक हिरानी यांनीही पटेलांचे अभियांत्रिकी कॉलेज आणि विद्यार्थ्यांनी तयार केलेले विविध मॉडेल्स पाहून जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्याचे सांगितले. कमी गुणांमुळे मला अभियांत्रिकीत प्रवेश मिळू शकला नाही. पण आज किमान अशा कॉलेजमध्ये काही क्षण वावरल्याचे समाधान लाभल्याचे ते म्हणाले. खा. पटेल यावेळी म्हणाले माझ्या वडीलांनी त्याकाळी गोंदिया-भंडारा जिल्ह्यासाठी जी शिक्षणाची सोय करून दिली त्यात नवनवीन अभ्यासक्रमांची भर घालून येथील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बाहेर जाण्याची गरज पडू नये अशी व्यवस्था केली. यामागे पैसे कमविणे हा आमचा हेतू नाही. जिल्ह्यासाठी काही करू शकलो याचे समाधान हीच आमची कमाई असल्याचे ते म्हणाले. (जिल्हा प्रतिनिधी)