शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया दहशतीत, बाजारपेठ ठप्प

By admin | Updated: March 19, 2015 01:13 IST

गोंदियाचे माजी नगर परिषद उपाध्यक्ष तथा विरोधी पक्ष नेता पंकज यादव यांच्यावर प्राणहातक हल्ला करणाऱ्या आरोपींना अटक ...

गोंदिया : गोंदियाचे माजी नगर परिषद उपाध्यक्ष तथा विरोधी पक्ष नेता पंकज यादव यांच्यावर प्राणहातक हल्ला करणाऱ्या आरोपींना अटक करण्याच्या मागणीवरून यादव समर्थक गटातील १२५ जणांनी बुधवारी सकाळी ९ वाजता शहर पोलीस ठाण्यावर हल्लाबोल केला. त्यांनी काचेच्या बाटल्यांनी एका पोलीस शिपायाला मारहाण केली. त्यामुळे गोंदिया शहरात दिवसभर तणाव होता. दरम्यान या दहशतीच्या वातावरणात बाजारपेठही दिवसभर बंद होती.यादव यांच्यावर मंगळवारी सायंकाळी ७.१५ वाजता दोन अज्ञात तरूणांनी प्राणघातक हल्ला केला. त्यांच्यावर केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार केल्यावर पुढील उपचारासाठी रात्री ९ वाजताच्या सुमारास नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात यावी या मागणीसाठी यादव गटातील १२५ जणांनी बुधवारच्या सकाळी ९ वाजतादरम्यान गोंदिया शहर पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.यावेळी काही युवकांनी शहर पोलीस ठाण्याच्या समोर लागलेल्या काचांनी तोडफोड केली. तसेच तेथे ड्युटीवर असलेले पोलीस कर्मचारी ओमप्रकाश हेमंत रहिले (ब.नॅ ७९८ ) यांना बॉटलने मारहाण केली. या प्रकरणावरून गोंदिया शहरात दिवसभर दहशतीचे वातावरण होते. व्यापाऱ्यांची प्रतिष्ठाने बंद करण्यात आली होती. दिवसभर ही दुकाने बंद होती. विशेष बहुतांश शाळांनीही बुधवारी सुरक्षेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना आधीच सुटी जाहीर केली. शहरात या घटनेनंतर दहशतीचे वातावरण आहे. ग्रामीण भागातील लोक खरेदीसाठी शहरात आले असता त्यांना रिकाम्या हातांनी परतावे लागले. (तालुका प्रतिनिधी)