शहरं
Join us  
Trending Stories
1
Gold Rate Prediction: सोने तब्बल २७ हजारांनी महाग होणार; डॉलर वाचविण्यासाठी केंद्र सरकारचा ‘सोन्या’वर घाव
2
'नीट'ला नाट : पेपरफुटीप्रकरणी सीबीआयचे छापे, ५ जणांना अटक; डॉक्टरांची संघटना एनटीएविरोधात सर्वोच्च न्यायालयात
3
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील युवकांना एटीएसने घेतले ताब्यात; ५७ जण रडारवर
4
Gold Silver Rate:आयात शुल्कवाढीचा झटका; सोने ८ हजार रुपये, तर चांदी २० हजारांनी महागली
5
Mhada Lottery 2026: म्हाडा घरांच्या लॉटरीला दुसऱ्यांदा मुदतवाढ; आता कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करता येणार? 
6
11th admission: अकरावी प्रवेशावेळी तांत्रिक अडचणी, शेकडो पालक-विद्यार्थ्यांना मनस्ताप
7
संकट दारात उभे; पण कोणाकडेही उत्तर नाही; उद्योगपती उदय कोटक यांचा भारतीयांना धोक्याचा इशारा
8
पीएम मोदींसह अनेक मंत्र्यांनी केली ताफ्यात 'काट'कसर; भाजपशासित मुख्यमंत्र्यांनीही केल्या अनेक उपाययोजना
9
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
10
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
11
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
12
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
13
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
14
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
15
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
16
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
17
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
19
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
20
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

गोंदियातील बनावट नोटांचे कनेक्शन अकोल्यात!

By admin | Updated: July 11, 2014 00:23 IST

गोंदियातील दोन व्यापार्‍यांकडून पोलिसांनी जप्त केलेल्या बनावट चलनी नोटांचे ‘कनेक्शन’ अकोल्यात असल्याचे समोर आले आहे.

अकोला: गोंदियातील दोन व्यापार्‍यांकडून पोलिसांनी जप्त केलेल्या बनावट चलनी नोटांचे ह्यकनेक्शनह्ण अकोल्यात असल्याचे समोर आले आहे. आमगाव येथील प्रल्हाद दुबे व नवीन असाटी या व्यापार्‍यांनी १७ हजार रुपये दर्शनी मूल्याच्या बनावट नोटा चलनात आणल्याप्रकरणी गोंदिया पोलिसांनी त्यांना रविवारी अटक केली. त्यानंतर दुबे व असाटी यांना बनावट नोटांचा पुरवठा अकोल्यातून होत असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली. या प्रकरणी अकोल्यातील दिलीप वानखडे नामक इसमाचे नाव समोर आले आहे; मात्र हा इसम नेमका कोण आहे, कुठे राहतो, याबाबत पोलिसही अनभिज्ञ आहेत. अकोल्यात बनावट नोटा चलनात आणण्याचे काम त्याच्याच माध्यमातून होत असल्याची विश्‍वसनीय माहिती असून, पोलिस त्याचा शोध घेत आहे. अकोला पोलिसांनी गत २७ फेब्रुवारी रोजी अकोल्यातील गंगानगर भागातील एका बंगल्यात छापा घालून, एका महिलेसह एकूण तीन आरोपींना ४ लाख ७८ हजार रुपयांच्या बनावट नोटांसह अटक केली होती. ह्यकलर झेरॉक्सह्ण यंत्राच्या साहाय्याने बनावट चलनी नोटा तयार करण्याचे ह्यरॅकेटह्ण चालविणारा दीपक पवार नामक सफाई कामगार मात्र फरार झाला होता. काही दिवसांनंतर पोलिसांनी त्यालाही गजाआड केले. पवार त्याचा चालक, मुलगा व पुतण्याच्या माध्यमातून बनावट नोटा चलनात आणण्याचे काम करीत असे, असे त्याच्या चौकशीतून पुढे आले. ही टोळी गुजरात, मध्य प्रदेश व महाराष्ट्रातही ४0 हजार रुपयांमध्ये एक लाख रुपये दर्शनी मूल्याच्या बनावट नोटा पुरवित होती. दीपक पवार टोळीच्या तपासादरम्यानही दिलीप वानखडे हे नाव पुढे आले होते. त्यावेळी स्थानिक गुन्हे शाखेने त्याचा शोधही घेतला होता; मात्र कोणतेही धागेदोरे न मिळाल्यामुळे तपास रखडला. आता गोंदियातील कारवाईदरम्यान पुन्हा एकदा बनावट नोटांचे ह्यकनेक्शनह्ण अकोल्यात निघाल्याने, पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखासुद्धा याप्रकरणी तपास करणार आहे.