शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसांत गोंदिया व तिरोडा आगाराच्या ५२४ फेऱ्या झाल्या रद्द

By admin | Updated: October 16, 2014 23:26 IST

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी मनुष्यबळ व मशीन्स मतदान केंद्रांवर पोहचविण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील एसटी महामंडळाच्या गोंदिया व तिरोडा आगारातील एकूण ९४ बसेस करारबद्ध करण्यात आल्या.

गोंदिया : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी मनुष्यबळ व मशीन्स मतदान केंद्रांवर पोहचविण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील एसटी महामंडळाच्या गोंदिया व तिरोडा आगारातील एकूण ९४ बसेस करारबद्ध करण्यात आल्या. त्यामुळे १४ व १५ आॅक्टोबर या दोन दिवसांत दोन्ही आगारांतील बसेसच्या एकूण ५२४ फेऱ्या रद्द झाल्या. या प्रकारामुळे एसटी महामंडळाला लाभ झाला असला तरी सामान्य प्रवाशांची मात्र मोठीच गैरसोय झाली आहे. निवडणूक कामाचे पेमेंट विलंबाने मिळत असल्यामुळे आधी पेमेंट करा तेव्हाच बसेस पुरवू, अशी भूमिका गोंदिया आगाराने घेतली होती. मात्र निवडणूक विभागाने अग्रीम रक्कम देण्याचे मान्य केल्यावर गोंदिया आगाराने बसेस पुरविण्याचे मान्य केले. यात गोंदिया उपविभागासाठी ३३ बसेस गोंदिया आगारातून १४ व १५ आॅक्टोबर या दोन्ही दिवसांसाठी करारबद्ध करण्यात आल्या आहेत. म्हणजे १४ आॅक्टोबरला ३३ व १५ आॅक्टोबरला ३३ बसेस निवडणुकीच्या कामासाठी धावणार आहेत. तर देवरी उपविभागासाठी ३१ बसेस करारबद्ध करण्यात आल्या आहेत. १४ व १५ आॅक्टोबर या दोन्ही दिवशी प्रत्येकी सदर ३१-३१ निवडणूक कामासाठी धावणार आहेत. गोंदिया आगारातून गोंदिया उपविभागासाठी पुरविण्यात आलेल्या ३३ बसेसमध्ये भंडारा आगाराच्या सहा मीडी बसेस, तुमसर आगाराच्या दोन मीडी बसेस तर गोंदिया आगाराच्या दोन मीडी व २३ मोठ्या बसेसचा समावेश आहे. तसेच गोंदिया आगारातूनच देवरी उपविभागासाठी पुरविण्यात आलेल्या ३१ बसेसमध्ये २६ गोंदिया आगाराच्या व पाच साकोली आगाराच्या बसेसचा समावेश आहे. त्यामुळे या दोन दिवसात गोंदिया आगाराच्या एकूण ३६४ बसफेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. तिरोडा विभागासाठी तिरोडा आगाराच्या ३० बसेस दोन दिवसांसाठी करारबद्ध करण्यात आल्या आहेत. ३० बसेस १४ आॅक्टोबर व ३० बसेस १५ आॅक्टोबर रोजी निवडणुकीच्या कामासाठी धावणार आहेत. त्यामुळे तिरोडा आगाराच्या या दोन दिवसांत एकूण १६० फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तिरोडा व गोंदिया दोन्ही आगाराच्या सदर बसेस १४ व १५ आॅक्टोबर रोजी निवडणुकीच्या कामात असल्यामुळे दोन्ही आगारांच्या एकूण ५२४ बसफेऱ्या रद्द झाल्या. त्यामुळे इतरत्र जाणाऱ्या प्रवाशांना कमालीची गैरसोय झाली. (प्र्रतिनिधी)