शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

डीआरएमनंतर जीएमचा पाहणी दौरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2016 02:02 IST

दक्षीण, पूर्व, मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांचा दौरा सहा दिवसानंतर होणार आहे. तत्पूर्वी नागपूर विभागाचे विभागीय रेल्वे महाव्यवस्थापकांनी

तुमसर : दक्षीण, पूर्व, मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांचा दौरा सहा दिवसानंतर होणार आहे. तत्पूर्वी नागपूर विभागाचे विभागीय रेल्वे महाव्यवस्थापकांनी तुमसर रोड, गोबरवाही, डोंगरीबु. सुकली, डोंगरी बु. या रेल्वे स्थानकांची पाहणी केली. स्वच्छतेकडे त्यांनी विशेष लक्ष दिले. रेल्वे प्रशासन रेल्वे महाव्यवस्थापकांच्या दौऱ्यामुळे चिंतीत दिसत आहे.नागपूर विभागीय रेल्वे महाव्यवस्थापक आलोक कंसल व नागपूर विभागाचे वरिष्ठ रेल्वे अधिकारी बुधवारी तुमसर रोड रेल्वे स्थानकावर दूपारी १२ वाजताच्या सुमारास पोहोचले. संपूर्ण रेल्वे स्थानकांची त्यांनी पाहणी केली. नंतर त्यांचा ताफा गोबरवाही, डोंगरी बु. सुकली व तिरोडी येथे गेला. या रेल्वे स्थानकावर त्यांनी रेल्वे सदनिका परिसराला भेट देवून स्वच्छतेकडे लक्ष देण्याचे निर्देश दिले. संपूर्ण रेल्वे स्थानकाला फेरफटका मारला.१६ मार्चला तुमसर रोड, गोबरवाही डोंगरी बु. व तिरोडा या रेल्वे स्थानका व तुमसर ते तिरोडी पर्यंत रेल्वे ट्रॅकची पाहणी दक्षीण पूर्व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक पाहणी करणार आहेत. सिग्नलींग प्रणाली, मानव विरहीत क्रॉसींग, गोबरवाही, डोंगरी, तिरोडी येथील नविन रेल्वे स्थानकांचे बांधकामाची पाहणी करणार असल्याचे समजते.रेल्वे महाव्यवस्थापकांचा दौरा असल्याने तत्पूर्वी विभागीय रेल्वे महाव्यवस्थापक आलोक कंसल यांनी भेट देऊन पाहणी केल्याची माहिती आहे. स्वच्दतेकडे त्यांचा विशेष लक्ष असणार आहे. त्यामुळे संपुर्ण रेल्वे स्थानक व सदनिकांची स्वच्छता करण्यात आली आहे. रेल्वेचे प्रत्येक कार्यालय अपडेट करण्यात आले. रंगरंगोटी करण्यात आली असून रेल्वे सदनिकेअंतर्गत रस्ते नविन तयार करण्यात आले आहे. रेल्वे अंदाजपत्रकापूर्वीच रेल्वे महाव्यवस्थापकांचा दौरा निश्चित झाला होता, पंरतु तो काही कारणाने रद्द झाला. पुन्हा नविन तारिख येथे निश्चित करण्यात आली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी मात्र या दौऱ्याचा धसका घेतल्याचे जाणवत आहे.नागपूर-बिलासपूर दरम्यान हायस्पीड रेल्वे धावणार असल्याची घोषणा यापूर्वी करण्यात आली होती. त्या अनुषंगाने या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. नागपूर विभागाचे काही रेल्वे स्थानक बिलासपूर झोनला जोडण्याकरिता हालचाली वरिष्ठ स्तरावर सुरु असल्याने या दौऱ्यात वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांचा अभिप्रायही घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.तिरोडी ते कटंगी दरम्यान सुमारे आठ किमी रेल्वे ट्रॅकचे काम मागील अनेक वर्षापाून रखडले आहे. तिरोडी भेटी दरम्यान या रेल्वे मार्गाची पाहणी रेल्वे महाव्यवस्थापक करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नागपूर दक्षिण पूर्व व मध्य रेल्वेचे प्रमुख रेल्वे स्थानक असून सुध्दा येथे विभागीय रेल्वे कार्यालय आहे. त्यामुळे नागपुर एक स्वतंत्र झोन म्हणून नव्याने होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विभागीय रेल्वे महाव्यवस्थापक व रेल्वे महाव्यवस्थापकांचा दौऱ्याला एक विशेष महत्व नक्कीच आहे. यावर मात्र रेल्वेचे अधिकारी बोलायला तयार नाही. (तालुका प्रतिनिधी)