शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

२५०० ‘सुकन्यां’ना भविष्याचा वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2015 01:51 IST

मुलींना मुलांपेक्षा कमी लेखू नये, मुलांप्रमाणे मुलींची पालकांनी देखरेख करून त्यांना गगनभरारी घेण्यासाठी प्रवृत्त करावे, ...

योजनेला प्रतिसाद कमीच : आता डाकघरातही खातेदारांसाठी एटीएमनरेश रहिले गोंदियामुलींना मुलांपेक्षा कमी लेखू नये, मुलांप्रमाणे मुलींची पालकांनी देखरेख करून त्यांना गगनभरारी घेण्यासाठी प्रवृत्त करावे, मुलींच्या भृणहत्येवर आळा बसावा यासाठई केंद्र सरकारने पोस्ट आॅफिसमार्फत ‘सुकन्या योजना’ सुरू केली. यामुळे पालकांमध्ये मुलींबद्दल जागरूकता वाढत असली तरी हे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमीच आहे. ३ डिसेंबर २०१४ पासून भारतीय डाक विभागाद्वारे सुरू करण्यात आलेल्या या योजनेत आतापर्यंत २५०० सुकन्यांचे खाते उघडण्यात आले आहेत.जिल्ह्याची लोकसंख्या १३ लाखांपेक्षा जास्त आहे. ० ते १० वर्षे वयोगटातील मुलींची संख्या किमान दिड ते दोन लाखाच्या घरात निश्चितपणे आहे. मात्र या योजनेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या केवळ २५०० हजार असल्याने हे प्रमाण समाधानकारक नाही. ग्रामीण भागात या योजनेचे लाभार्थी वाढल्यास शेतकरी-शेतमजुर वर्गात मुलगी मोठी होताना वाढणारी चिंता बऱ्याच प्रमाणात दूर होईल. शेतकरी वर्ग नापिकी झाल्यानंतर मुलीचे लग्न कसे करायचे या चिंतेत वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्येचा मार्ग पत्करतात. मात्र सुकन्या योजनेच्या माध्यमातून पैशाची बचत झाल्यास त्यांना अशा पद्धतीने मृत्यूला कवटाळण्याची गरज भासणार नाही. मात्र पोस्ट खात्याकडून त्यासाठी योग्य प्रकारे प्रचार-प्रसार झाला नसल्याचे दिसून येत आहे.गोंदिया मुख्य डाकघरासह ११ उपडाकघरात ‘सुकन्या समृद्धी योजने’शिवाय पंतप्रधान सुरक्षा विमा योजना (पीएमएसबीवाय), पंतप्रधान जीवन ज्योती बीमा योजना (पीएमजेजेबीवाय) व अटल पेंशन योजनेचा (एपीवाय) लाभ घेण्यासाठी चढाओढ सुरू आहे.गोंदियातील ग्राहकांसाठी एटीएमनागपूर डाक क्षेत्रांतर्गत येणाऱ्या सर्व मुख्य व उपडाकघरांना कोर बँकिंग सोल्युशन (सीबीएस) प्लेटफॉर्मवर आणण्यासाठी एक परियोजना सुरू केली आहे. नागपूर डाक क्षेत्रातील सर्व खातेधारकांना देशातील सर्व डाकघरांच्या नेटवर्कसोबत जोडले जाणार आहे. यासोबतच गोंदिया जिल्ह्याचे डाकघर ग्राहक आपल्या मोबाईलवर देवाण-घेवाणाची माहिती घेऊ शकतात. आतापर्यंत नागपूर जीपीओ, नागपूर सिटी एचओ व यवतमाळ एचओ मध्ये एटीएम होते. आता गोंदिया मुख्य डाकघरातील खातेधारकांसाठी मोफत एटीएम कार्ड उपलब्ध केले जात आहे. देशातील १२४ पोस्टल एटीएम मध्ये कुठेही त्याचा वापर केला जाऊ शकतो.तिसऱ्या मुलीवर मिळतो लाभयोजनेंतर्गत २१ वर्ष पूर्ण झाल्यावर व्याजासह डाक विभागांतर्गत परत करण्यात आली. मुलमी १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर शिक्षण व विवाहासाठी ५० टक्के रक्कम आपल्या खात्यातून काढू शकतात. मुलगी १८ वर्ष पूर्ण झाल्यावर शपथपत्र दिले जाते. योजनेंतर्गत जमा होणाऱ्या रकमेवर ९.२ टक्के व्याजासह देण्यात येते. आयकरमध्येही सूट दिली जाते. १० वर्षापर्यंतच्या मुलीच्या आई-वडील, आजा-आजी नातच्या नावाने खाते उघडू शकतात. दोन जुळ्या मुलीनंतर तिसरी मुलगी झाल्यास तिलाही या योजनेचा लाभ घेता येऊ शकते.