शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

बौध्दिक व शारीरिक सुदृढतेसाठी खेळ महत्त्वाचे- तरोणे

By admin | Updated: December 20, 2015 01:53 IST

बौध्दिक सामर्थ्यासोबत शारीरिक सुदृढताही महत्वाची असते. आर्थिक व सामाजिक उत्क्रांती साधण्यासाठी उच्चतम बुध्दीमता तोड नसते.

अर्जुनी-मोरगाव : बौध्दिक सामर्थ्यासोबत शारीरिक सुदृढताही महत्वाची असते. आर्थिक व सामाजिक उत्क्रांती साधण्यासाठी उच्चतम बुध्दीमता तोड नसते. यालाच उत्तम आरोग्य व सृदृढ शरीराची जोड लाभली तर व्यक्तीला गगणभरारी घेणे सहज शक्य होईल. बुध्दी, आरोग्य, शारीरिक बळ जर आत्मसात करायचे असतील तर खेळरुपी शक्तीची साधना आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे यांनी केले. कुंभीटोला येथे केंद्र क्रीडा संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पंचायत समिती सभापती अरविंद शिवणकर, उपसभापती आशा झिलपे, जिल्हा परिषद सदस्य कमल पाऊलझगडे, पंचायत समिती सदस्य करूणा नांदगावे, विजयसिंह राठौड, जि.प. सदस्य गिरीश पालीवाल, गटशिक्षणाधिकारी स्वाती हवेले, सहकारी बँकेचे संचालक भोजराम रहेले, सेवा सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष अनिल दहिवले, सरपंच पद्मा राठौड, लिलाधर ताराम, बाजू भंडारी, माजी सरपच मोरेश्वर सौंदरकर उपस्थित होते. पुढे बोलताना तरोणे यांनी, क्रिकेट व फुटबाल प्रमाणे देशी खेळ खो-खो व कबड्डीला सरकारने प्रोत्साहन देण्यासाठी उपाययोजना कराव्यात. ग्रामीण भागातील खेळाडूंना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहचविण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल उचलण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. तिन दिवसीय क्रिडासत्रात अनेक शाळांनी सहभाग घेतला. विजेत्या संघांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. माध्यमिक विभागातून जि.प.शाळा मोरगाव, प्राथमिक विभागात जि.प.शाळा दाभना, खो-खो क्रीडा प्रकारात मुलांमध्ये प्रथम दाभना शाळा, द्वितीय मोरगाव शाळा तर मुलींमध्ये प्रथम दाभना शाळा, द्वितीय अरततोंडी शाळा. सांस्कृतीक स्पर्धात प्रथम बाराभाटी शाळा, द्वितीय कुंभीटोला शाळा, लेझीम शोड्रीलमध्ये जि. प. शाळा क्रं.२ अर्जुनीला प्रथम तर द्वितीय क्रमांक कुंभीटोला शाळेने पटकाविला. (तालुका प्रतिनिधी)