अर्जुनी मोरगाव तालुका समस्यामुक्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 06:00 AM2020-02-21T06:00:00+5:302020-02-21T06:00:09+5:30

या वेळी दिलेल्या इटियाडोह धरणाचे पाणी ज्या गावांना मिळत नाही, अशा गावापर्यंत पाणी पोहचवावे, झाशीनगर उपसा सिंचन योजनेला गती देण्यात यावी. कुशल कामाचे थकीत देयके त्वरित देण्यात यावे, मनरेगाचे अकुशल काम त्वरीत सुरु करावे. ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देऊन सोयी सुविधा द्या. मनरेगाचे २५ लाखापर्यंतचे अंदाजपत्रकांना पंचायत समिती स्तरावर तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी देण्यात यावी.

Free Arjuni Morgaon taluka | अर्जुनी मोरगाव तालुका समस्यामुक्त करा

अर्जुनी मोरगाव तालुका समस्यामुक्त करा

googlenewsNext
ठळक मुद्देसरपंच संघटनेची मागणी : लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे

लोकमत न्यूज नेटवर्क
बोंङगावदेवी : अर्जुनी मोरगाव तालुका जिल्ह्याच्या टोकावर असून नक्षलप्रभावित आहे. सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे यासाठी एकही उद्योग नाही. तालुक्यातील काही गावांमध्ये बारमाही जलसिंचनाच्या सोयींचा अभाव आहे. उपजिल्हा रुग्णालयाचा अभाव आहे. यासर्व समस्या मार्गी लावण्याची मागणी अर्जुनी मोरगाव तालुका सरपंच संघटनेतर्फे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले व आ.मनोहर चंद्रिकापूरे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
या वेळी दिलेल्या इटियाडोह धरणाचे पाणी ज्या गावांना मिळत नाही, अशा गावापर्यंत पाणी पोहचवावे, झाशीनगर उपसा सिंचन योजनेला गती देण्यात यावी. कुशल कामाचे थकीत देयके त्वरित देण्यात यावे, मनरेगाचे अकुशल काम त्वरीत सुरु करावे. ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देऊन सोयी सुविधा द्या. मनरेगाचे २५ लाखापर्यंतचे अंदाजपत्रकांना पंचायत समिती स्तरावर तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी देण्यात यावी. जिल्हा परिषद शाळांच्या जीर्ण व धोकादायक इमारतींना पाडण्याची मंजुरी द्यावी, ग्रामपंचायतच्या जीर्ण ईमारती पाडून नवीन बांधकामास परवानगी द्यावी. ग्रामसभेने ठरवलेल्या लाभार्थ्यांना प्राधान्यक्रम देऊन घरकुलाचा कार्यारंभ आदेश द्यावा. १४ व्या वित्त आयोगातून संगणक परिचालकाचे वेतन न देता जिल्हा परिषदेच्या निधीमधून देण्यात यावे. १४ व्या वित्त आयोगाच्या सन २०१६-१७, १७-१८ व १८-१९ या वर्षाचा फरफार्मन्स निधी त्वरित ग्रामपंचायतच्या खात्यात जमा करावा.
सरपंच व उपसरपंच यांचे मानधन लोकसंख्येवर आधारीत न ठेवता सरसकट पाच व तीन हजार रुपये करावे आदी मागण्यांचा समावेश होता. शिष्टमंडळात संघटनेचे अध्यक्ष हेमकृष्ण संग्रामे, सरचिटणीस अशोक कापगते, डॉ. अजय अंबादे, यादवराव मसराम, लालसिंह चंदेल, पदमा राठोड, डॉ. दिपक रहिले, प्रकाश शिवणकर, ज्ञानेश्वर चौधरी, कुंडा डोंगरवार यांचा समावेश होता.

Web Title: Free Arjuni Morgaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.