शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
3
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
4
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
5
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
6
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
7
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
8
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
9
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
10
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
11
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
12
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
13
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
14
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
15
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
16
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
17
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
18
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
19
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
20
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

दोन बिबट्याच्या शिकारप्रकरणी चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:27 IST

गोंदिया : गोरेगाव वनपरिक्षेत्रात असलेल्या इंदिरानगर तिल्ली येथील देवानंद सोनवाणे यांच्या शेतातील विहिरीत ३ जानेवारीला एक बिबट आढळला. या ...

गोंदिया : गोरेगाव वनपरिक्षेत्रात असलेल्या इंदिरानगर तिल्ली येथील देवानंद सोनवाणे यांच्या शेतातील विहिरीत ३ जानेवारीला एक बिबट आढळला. या बिबट्याच्या मृत्यूचा कारणांचा शोध घेत असता ४ जानेवारीला त्याच घटनास्थळालगत लागून असलेल्या जंगलात झुडपामध्ये दुसऱ्या बिबट्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला होता. या प्रकरणात आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींची संख्या चार झाली आहे.

आरोपीत हेतराम मधू गावळ (३८) रा. इंदिरानगर तिल्ली, देवराम श्यामलाल नागपुरे (३०) रा. चोपा (बाजारटोला) यांना आधीच अटक करण्यात आली हाेती. आज (दि.१७) रोजी लिंगम रमेश येरोला (५५) रा. चोपा बाजारटोला, हेतराम गणपत मेश्राम (४१) रा. चोपा बाजारटोला या दोघांना अटक करण्यात आली. लिंगम याने गावातीलच मन्साराम यांच्या घरी लपवून ठेवलेली चार वाघनखे जप्त करण्यात आली. यातील दोन आरोपींना न्यायालयाने २० जानेवारीपर्यंत वनकोठडी सुनावली आहे. रविवारी दोन आरोपींना अटक करण्यात आली. त्यांना १८ जानेवारी रोजी न्यायालयात हजर केले जाणार आहे. या प्रकरणात दोन्हीही बिबट्यांचे पुढच्या पायाचे पंजे शिकाऱ्यांनी चोरून नेले होते. एका बिबट्याचे डोके चोरले आहे. शिवाय मृत निलगाईचे मांस स्वतः खाण्यासाठी व इतरांना खाण्यासाठी पैशाच्या मोबदल्यात विक्री केल्याची माहिती वनाधिकाऱ्यांना मिळाली. आरोपींनी विद्युत करंट लावून रात्रीच्या वेळी शिकार केली. झडतीदरम्यान वनविभागाने बिबट्याचे दोन पंजे नखासहित, चितळाचे मुंडके, वन्यप्राण्यांची हाडे, रविवारी (दि.१७) लिंगम रमेश येरोला याच्याकडून चार नखे जप्त केली आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.