शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
2
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
3
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
4
प्रेयसीच्या भावावर सूड उगवण्यासाठी दीड वर्षाच्या चिमुरडीचा काटा काढला; १३ वर्षांनंतर न्याय मिळालाच!
5
हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव
6
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
7
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
8
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
9
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
10
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
11
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
12
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
13
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
14
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
15
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
16
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
17
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
18
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
19
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
20
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
Daily Top 2Weekly Top 5

चार अपघात, एक ठार

By admin | Updated: January 1, 2015 23:04 IST

‘थर्टी फर्स्ट’ साजरा करण्यासाठी जात असताना कार अपघातात एका तरूणाचा मृत्यू झाला तर सोबत असलेला दुसरा तरूण गंभीर जखमी झाला. यासोबतच इतर तीन अपघात पाच जण जखमी झाले.

कार पुलावर धडकली: ‘थर्टी फर्स्ट’च्या आनंदावर विरजण देवरी : ‘थर्टी फर्स्ट’ साजरा करण्यासाठी जात असताना कार अपघातात एका तरूणाचा मृत्यू झाला तर सोबत असलेला दुसरा तरूण गंभीर जखमी झाला. यासोबतच इतर तीन अपघात पाच जण जखमी झाले.आमगाव येथील धम्मगिरी पहाडीजवळ ३१ डिसेंबर रोजी रात्री १०.३० वाजतादरम्यान कारला अपघात घडला. त्यात अंशुल उर्फ बट्टू अनिल अग्रवाल (२९, रा.देवरी) हे ठार झाले.देवरी येथील व्यापारी व भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सहसचिव अनिल अग्रवाल यांचा धाकटा मुलगा अंशुल अग्रवाल हा त्यांचा मुनिम गौरीशंकर भिवाजी वासनिक (३५,रा.मरामजोब) याला घेऊन हुंडई कार (एमएच ३५/पी ४६३१) ने थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी गोंदियाला येत होता. मात्र भरधाव वेगात असलेली कार धम्मगिरी पहाडीजवळ पुलाच्या पिलरला धडकली. यामध्ये अंशुलचा जागीच मृत्यू झाला. गौरीशंकर हा गंभीर जखमी झाला असून त्याला गोंदिया व नंतर नागपूरला खाजगी रूग्णालयात पाठविण्यात आले आहे. आमगाव पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. पती-पत्नी जखमी देवरी- आमगाव तालुक्यातील ग्राम कवडी निवासी दाप्मत्य अपघातात जखमी झाल्याची घटना ३१ डिसंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता दरम्यान आमगाव-देवरी राज्य मार्गावर घडली. खेमराज तुळशीराम बागडे (३९) व त्यांच्या पत्नी पुस्तकला (३२) मुरदोली येथील साक्षगंधाचा कार्यक्रम आटोपून दुचाकी (एमएच ३५/एच५७७४) ने परत येत असताना त्यांना मागून येत असलेल्या फियाट कार (एमएच३१/एच ००८५) ने धडक मारली. यामध्ये दोघे जखमी झाल्याने त्यांना देवरी येथील ग्रामीण रूग्णालयात भर्ती करण्यात आले. अपघातात जखमी चिचगड येथे घडलेल्या अपघातात ममता विश्वनाथ नखाते (३०,रा.देवरी) या ३१ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजतादरम्यान जखमी झाल्या. त्यांना उपचारार्थ रात्री ८.२० वाजतादरम्यान येथील केटीएस रूग्णालयात भर्ती करण्यात आले. महेंद्र धनलाल भूरे (२७,रा.बाम्हणी) हे सुद्धा अपघातात जखमी झाल्याने त्यांनाही केटीएस रूग्णालयात भर्ती करण्यात आले आहे.दुचाकीची टक्करगोंदिया-सडक अर्जुनी मार्गावर दुचाकी क्रमांक एमएच३६/यु ६७२२ तसेच एमएच ३१/वाय ७५३७ यांची आपसात धडक लागल्याने दोघे जखमी झाले. ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता दरम्यान हा अपघात घडला. (शहर प्रतिनिधी)