शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

वन कर्मचारी खुर्ची लावून घेतात ‘सावजा’चा शोध

By admin | Updated: December 3, 2015 02:16 IST

तालुक्यात विर्सी येथे वनक्षेत्राधिकारी यांचे कार्यालय आहे. नगरातील आंबेडकर चौकातील वनचौकीत

वनरक्षकाची उर्मटगिरी : आंबेडकर चौकातील वनचौकीआमगाव : तालुक्यात विर्सी येथे वनक्षेत्राधिकारी यांचे कार्यालय आहे. नगरातील आंबेडकर चौकातील वनचौकीत वनरक्षकांची उर्मटगिरी अनेक दिवसांपासून सुरू आहे. वनचौकीत काही वनकर्मचारी खुर्च्यावर बसून टवाळक्या करीत असतात व त्यातच सावजाच्या शोधात राहतात. कोणी ग्राहक मिळाला की त्याच्याकडून नियमबाह्य वसुली करतात. येथील एका वनरक्षकामुळे शासनाचा महसूल बुडत असून अवैध प्रकाराला ऊत आला आहे.आंबेडकर चौकातील वनचौकीत नगरातील एक वनरक्षक कार्यरत आहे. त्याची पत्नी जवळच नोकरीला असल्याने तो आपल्या सोयीनुसार वनविभागात नोकरी करतो. एखाद्या मेटॅडोरमधून किन्हीचे तयार केलेले साहित्य नेले व त्यावेळी गाडी चालकाकडे टी.पी. नाही तर त्याच ठिकाणी टी.पी. येईपर्यंत गाडी उभी करायला हवी. मात्र या उर्मट वनरक्षकाने आपणाला काही चिरीमिरी मिळत नाही, असे समजताच आपली दगंबगिरी दाखदिली. रजिस्टवर काहीच नोंद न करता गाडी सोडली. मात्र रस्त्यात कोणी पकडले तर आपण जबाबदार राहणार नाही, असे सुचविले. मात्र गाडी गेल्यानंतर या चतुर व चानाक्ष वनरक्षकाने समोरील मार्गावरील अधिकाऱ्यांना सांगितले. गाडीचालक किंवा माल घेणाऱ्याला या चालाक वनरक्षकाची चाल ओळखला आली नाही. समोरील अधिकाऱ्यांनी गाडी पकडली व देवरी येथल वन अधिकाऱ्यांनी चक्क १० हजार रुपये घेऊन गाडी रात्रभर सावली येथे नेवून सोडली. या आंबेडकर चौकातील वनचौकीत अनेक गालेबोटे चालतात. रात्री मेटॉडोअर किंवा ट्रकमधून अवैध उपजाऊ लाकूड चोरुन निर्यात होतो. यात अनेकांचे हित गुंतले आहेत. सदर प्रकरणाबाबत विर्सी येथील वनक्षेत्राधिकारी यांच्याशी संपर्क केला असता त्यांचा फोन बंद होता. या चौकीसमोर रात्री मोठ्या प्रमाणात अवैध लाकडाची चोरी होते. मात्र सांठगाठमधून जसे काही होत नाही असा देखावा दाखवितात. नगरातील हा उर्मट वनरक्षक मनमर्जीने काम करीत आहे. याच्यावर तात्काळ कारवाई करुन त्याला हटविण्याची मागणी अनेकांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)