शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

गोंदिया जिल्ह्यातून प्रथमच काँग्रेस झाली भुईसपाट ! पराभवाचे आत्मचिंतन करणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 15:42 IST

Gondia Assembly Vidhan Sabha Election 2024 Results : बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात काँग्रेसचा दारुण पराभव

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात या विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला. जिल्ह्यातील चारपैकी एकही जागा कायम ठेवण्यात काँग्रेसला यश आले नाही. त्यामुळे जिल्ह्यातून काँग्रेस प्रथमच भुईसपाट झाली. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीतील यशाने काँग्रेसला हुरूप आला होता व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता; पण हा उत्साह विधानसभा निवडणुकीत कायम ठेवण्यात काँग्रेसला अपयश आले. त्यामुळेच जिल्ह्यात काँग्रेस पक्षाच्या झालेल्या पाणीपतवर काँग्रेस नेते मंथन करणार का असा सूर राजकीय वर्तुळात निकालानंतर उमटत आहे.

सन १९७८ पासून झालेल्या विधानसभा निवडणुकांवर नजर टाकल्यास प्रत्येक निवडणुकीत जिल्ह्यात काँग्रेसचे वर्चस्व कायम राहिले. चार मतदारसंघापैकी कधी दोन तर कधी तीन जागांवर काँग्रेस विजय प्राप्त केला होता. त्यातच गोंदिया विधानसभा मतदारसंघ हा तर काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघात आतापर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेस, शिवसेना वगळता भाजपचा कधी विजय झाला नव्हता; पण या निवडणुकीत भाजपचे आ. विनोद अग्रवाल यांनी ६१ हजार मतांनी विजय प्राप्त करून या मतदारसंघात प्रथमच कमळ फुलवित इतिहास रचला. आमगाव मतदारसंघात गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे वर्चस्व होते. या निवडणुकीत काँग्रेसने विद्यमान आ. सहषराम कोरोटे यांचे तिकीट कापत अत्यंत नवखा चेहरा राजकुमार पुराम यांना उमेदवारी देण्याचा अति आत्मविश्वासाने प्रयोग केला. हा प्रयोगसुध्दा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा फसला. तर अर्जुनी मोरगाव मतदारसंघात स्थानिक पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या प्रचंड विरोधानंतरही मतदारसंघाबाहेरील चेहरा दिला. 

प्रचाराचा शेवटच्या टप्प्यात काँग्रेसने अंतर्गत वादावर पडदा टाकून एकदिलाने काम केले; पण तोपर्यंत बरेच पाणी वाहून गेले होते तर मतदारांमध्ये जो संदेश जायचा तो गेलाच. मतदारांनी मतदारसंघाबाहेरील चेहरा नाकारला. त्यामुळे काँग्रेसने केलेले हे दोन्ही प्रयोग फसले. तर गोंदिया विधानसभा मतदारसंघात विकास आणि कंत्राटदार नावावर केलेला प्रचारसुध्दा मतदारांना भावला नाही. उलट मतदारांनी या मतदारसंघाचे आ. विनोद अग्रवाल यांच्यावर गेल्या निवडणुकीपेक्षा अधिक विश्वास व्यक्त करीत ६१ हजार मताधिक्यांनी निवडून दिले. यातून जो संदेश जायचा तो गेलाच पण यातून आता काँग्रेस नेमका काय बोध घेते हे देखील महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

पराभवानंतर अंतर्गत खदखद बाहेर गोंदिया जिल्ह्यात काँग्रेसच्या पराभवला केवळ प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आत्मविश्वास असल्याची टीका आता काँग्रेसमधून होऊ लागली आहे. कालपर्यंत पटोलेंच्या सतत आजूबाजूला असणारेच आता त्यांच्यावर टीका करीत त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करीत आहे. तर काही काँग्रेसचे प्रामाणिक कार्यकर्ते नानाभाऊंचे चुकलेच असे खासगीत बोलू लागले आहे. त्यामुळे जिल्ह्यात काँग्रेसचे पाणीपत झाल्यानंतर अंतर्गत खदखद बाहेर येऊ लागली आहे.

सहषराम कोरोटे प्रचारांपासून दूरच आमगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आ. सहषराम कोरोटे यांचे तिकीट पक्षाने ऐनवेळी कापल्याने ते प्रचंड नाराज होते. प्रचारात फिरलो आणि काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला तर त्याचे खापर आपल्यावरच फोडले जाईल त्यामुळे ते प्रचारापासून दूर राहिले. यामुळे मतदारसंघात जो संदेश जायचा तो गेलाच व नवख्या चेहऱ्याला संधी देणे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना अंगाशी आले.

काँग्रेसमध्ये कोण घालणार उत्साहाची फुंकरलोकसभा निवडणुकीतील यशाने जिल्ह्यातील काँग्रेस नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता. पण विधानसभेतील पराभवानंतर पुन्हा नैराश्य पसरले आहे. हे नैराश्य दूर करण्यासाठी आता कोण फुंकर घालणार याची चर्चा आहे. विजयाचे जसे भागीदार सर्व भागीदार असतात ते पराजयाचे भागीदार होऊन जिल्ह्यातील काँग्रेसजण पुन्हा एकदिलाने कामाला लागणार का याकडे नजरा लागल्या आहेत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024gondiya-acगोंदियाcongressकाँग्रेस