शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

गृहविलगीकरणातील रुग्णांच्या मदतीला धावून आले पाच युवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 05:00 IST

जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आली. दररोज हजारो कोरोनाबाधितांची नोंद होत होती. कमी प्रमाणात लागण असलेल्या रुग्णांना गृहविलगीकरणात राहण्याचा सल्ला डॉक्टर देत होते. मात्र, अशा परिस्थितीतदेखील घरातील महिलेला जर कोरोनाची लागण झाली असेल, तर घरातील स्वयंपाक कोण करेल, लहान मुलांकडे  लक्ष कोण देणार, असा प्रश्न होत होता. अशा लोकांच्या मदतीला गोंदियातील पाच मित्र धावून आले. त्यांनी हम है दोस्त सेवा समिती गठीत केली. 

ठळक मुद्देदोन वेळेच्या जेवणाचा नि:शुल्क पुरवठा : हम है दोस्त समितीची साथ

­लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  कोरोना संक्रमण काळात गोंदिया शहरातील अनेक कुटुंब कोरोनाबाधित झालेले होते. अशात घरी जेवण तयार करणारासुद्धा कुणी नव्हता. त्यामुळे गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला. अशात शहरातील पाच युवकांनी पुढे येत हम है दोस्त सेवा समितीच्या माध्यमातून गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांना दोन वेळच्या जेवणाचा मोफत पुरवठा करून आधार दिला. युवकांच्या या उपक्रमाची सध्या सोशल मीडियावर जोमात चर्चा सुरू आहे. अनेकदा संकटकाळात नातेवाईक किंवा जवळचे धावून येत नाहीत, असा अनुभव अनेकांचा आहे, तर बरेचदा ओळखपाळख नसलेल्या व्यक्तीसुद्धा मदतीला धावून येतात. संकटकाळात धावून येणाराच खरा मित्र आणि नातेवाईक असतो, असे म्हटले जाते. ते खरेदेखील आहे. कोरोना संसर्गाच्या काळात अनेकांनी याचा अनुभवसुद्धा घेतला आहे. जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आली. दररोज हजारो कोरोनाबाधितांची नोंद होत होती. कमी प्रमाणात लागण असलेल्या रुग्णांना गृहविलगीकरणात राहण्याचा सल्ला डॉक्टर देत होते. मात्र, अशा परिस्थितीतदेखील घरातील महिलेला जर कोरोनाची लागण झाली असेल, तर घरातील स्वयंपाक कोण करेल, लहान मुलांकडे  लक्ष कोण देणार, असा प्रश्न होत होता. अशा लोकांच्या मदतीला गोंदियातील पाच मित्र धावून आले. त्यांनी हम है दोस्त सेवा समिती गठीत केली. गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांना दोन वेळचे मोफत जेवण देण्याचा निर्णय घेत त्याची सुरवात केली, तर इतर मित्रांनीदेखील त्यांच्या या उपक्रमात सहभाग घेतला. अल्पावधीतच त्यांच्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळू लागला आणि मदतीसाठीसुद्धा अनेक हात पुढे येऊ लागले. 

जेवणात दिले जात आहेत हे पदार्थn हम है दोस्त समितीच्या माध्यमातून गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांना नि:शुल्क जेवणाची व्यवस्था केली जात आहे. जेवणात नियमित सलाद, पापड, भाजी, वरण, पोळी, भात, लोणचं, गोड पदार्थ दोन्हीवेळा दिले जाते. जेवणाचा दर्जा चांगला राहील याची काळजीसुद्धा हम है दोस्त सेवा समितीचे रोनक सिंघानिया, डॉ. विनोद बडोले, लुपेश मेश्राम, रवी डागा, प्रदीप सोनी, महेश सोनछात्र, अर्पित अग्रवाल हे युवक घेत आहेत.  

कोरोनाकाळात रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना अनेकांनी मोफत जेवण दिले. मात्र, कोरोनाबाधित झाल्यावर घरपोच मोफत जेवण देण्याचा हा अनोखा उपक्रम गोंदिया जिल्ह्यात प्रथमच पहावयास मिळत आहे. या उपक्रमाची सुरुवात करणाऱ्या युवकांचे कार्य कौतुकास्पद आहे. - विनोद दास, नागरिक.

पाच डब्यांपासून केली सुरुवात सुरुवातीला गृहविलगीकरणात असलेल्या पाच रुग्णांच्या घरी नि:शुल्क जेवणाचे डबे पोहोचविण्यास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर याला प्रतिसाद मिळू लागला. त्यामुळे पाच डब्यांपासून सुरू केलेला उपक्रम आज ३०० डब्यांच्यावर गेला आहे. त्यांच्या या अनोख्या उपक्रमाची चर्चा सोशल मीडियावर होताच अनेक गुप्त दान करणारे लोक समोर येत आहेत. हम है दोस्त सेवा समितीला मदत करीत आहेत. बाधित रुग्णांना सकस आहार मिळावा यासाठी डॉक्टरदेखील त्यांच्या या उपक्रमात सहभागी झाले आहेत. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या