शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

गावकऱ्यांनी पकडले अवैध गौण खनिजाचे पाच टिप्पर

By admin | Updated: February 13, 2015 01:10 IST

परसटोला येथील गावकरी आणि ग्रा.पं.सदस्यांच्या पुढाकाराने एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या रस्त्याच्या बांधकामाकरिता येत असलेले अवैध मुरूमाचे पाच टिप्पर पकडण्यात आले.

देवरी : परसटोला येथील गावकरी आणि ग्रा.पं.सदस्यांच्या पुढाकाराने एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या रस्त्याच्या बांधकामाकरिता येत असलेले अवैध मुरूमाचे पाच टिप्पर पकडण्यात आले. बिना रॉयल्टीने त्यांची वाहतूक सुरू होती. अखेर त्यांना तहसीलदाराकडे सुपूर्द करून कारवाई करण्यास बाध्य करण्यात आले. ही कारवाई गुरुवारी सकाळी ११ वाजता करण्यात आली.हा प्रकार लक्षात आल्यानंतर ग्रा.पं. सदस्य प्रवीण दहीकर यांनी मंडळ अधिकाऱ्याला दूरध्वनीवर माहिती देऊन कारवाई करण्यास सांगितले. मात्र मंडळ अधिकाऱ्याने कामात व्यस्त असल्याचे सांगून घटनास्थळावर येण्यास नकार दिला. त्यानंतर दहीकर यांनी थेट तहसीलदारांकडे या पाचही गाड्यांकडे रॉयल्टी नसल्याचे व मंडळ अधिकारी येत नसल्याची तक्रार केली. तेव्हा तहसीलदारांनी मंडळ अधिकारी सिंधी मेश्राम व तलाठी गुप्ता यांना घटनास्थळावर जाण्याचा आदेश दिला. तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी पाचही टिप्पर तहसील कार्यालयात जमा केले. यानंतर सबंधित ठेकेदार तहसील कार्यालयात पोहोचले व त्यांनी तहसीलदाराला शासनाचे परिपत्रक दाखविले. कारवाई होण्यात वेळ लागत आहे, असे दिसताच ग्रा.पं. सदस्य व ग्रामवासीयांनी थेट तहसील कार्यालय गाठून तहसीलदार संजय नागटिळक यांना जाब विचारला. तेव्हा नागटिळक यांनी टिप्पर एमएच ३५/के-३८६८, एमएच ३६/पी-०२२८, एमएच ३५/के-१२३७, एमएच ३५/के-३८६९, एमएच २९/टी- ६६८ या पाचही टिप्परवर अवैध गौण खनिज अधिनियमाअंतर्गत कारवाई करून ३२ हजार रुपयांचा दंड ठोठावला. या अवैध गौण खनिजचे पाच टिप्पर पकडून शासनाची तिजोरी भरून देण्यात ग्रा.पं. सदस्य दहीकर, संतोष मडावी, सुरेश वैद्य, प्रफुल भोयर, शिवचरण गुरूपंच नवलसिंग वट्टी, अरूण गायकवाड यांनी मोलाची कामगिरी बजावली. (प्रतिनिधी)दोन वर्षांपासून दुर्लक्षविशेष म्हणजे मागील दोन वर्षापासून तालुक्यात अवैध गौण खनिजाची वाहतूक सर्रासपणे होत आहे. परंतु तालुक्याचे तलाठी मूकदर्शक बनलेले आहेत. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा कारभार बिनधास्तपणे सुरू असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांचे कार्य ग्रामवासीयांना करावे लागत आहे.