शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव ट्रकने इसमाला चिरडले

By admin | Updated: December 24, 2015 02:26 IST

नवेगाव येथून मोहदुराकडे जाणाऱ्या एका सायकलस्वाराला शहापूरहून सातोनाकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने चिरडले.

मृतदेह झाला छिन्नविछिन्न : सातोना-शहापूर मार्गावरील घटनामोहदुरा : नवेगाव येथून मोहदुराकडे जाणाऱ्या एका सायकलस्वाराला शहापूरहून सातोनाकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने चिरडले. यात दामा फुकटू कुंभरे (६०) रा.नवेगाव या इसमाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारला सकाळी ११.३० वाजताच्या दरम्यान सातोना मार्गावरील मोहदुरा वळणावर घडली. अंगावर शहारे आणणाऱ्या या घटनेमुळे पोलीस प्रशासनाविरुद्ध संताप केला जात आहे. दामा कुंभरे हे बेलदारीचे काम करतात. आज मंगळवारला कामाला सुटी असल्यामुळे ते काही कामानिमित्त ते मोहदुरा येथे सायकलने निघाले. दरम्यान शहापूरहून भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने नवेगाव-मोहदुरा मार्गावरील वळणावर त्यांच्या सायकलला जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की, कुंभरे यांचा घटनास्थळीच ठार होऊन मृतदेह छिन्नविछिन्न झाला. घटनेनंतर ट्रक चालक ट्रक घेऊन पसार झाला. अपघाताची वार्ता पसरताच घटनास्थळी बघणाऱ्यांची मोठी गर्दी उसळली होती. या घटनेची माहिती भंडारा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतकाच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी असा आप्तपरिवार आहे. घटनेचा तपास भंडारा पोलीस करीत आहेत. (वार्ताहर)प्रशासनाचे लक्ष केव्हा जाणार ?सातोना - शहापूरमार्गे दररोज शेकडो ट्रकांचे आवागमन भरधाव वेगात सुरु असते. यामध्ये सर्वाधिक प्रमाण रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रकचे आवागमन असते. दिवसरात्र सुरु असलेल्या या जड वाहतुकीमुळे परिसरातील नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. सहा महिन्यापूर्वी रेतीच्या भरधान ट्रॅक्टरने एका बालिकेचा चिरडले होते. आज पुन्हा ट्रकच्या धडकेत एका इसमाचा नाहक बळी गेला. या मार्गावर अनेकदा लहानमोठे अपघात सुद्धा घडलेले आहेत. या रस्त्यावर असलेल्या वृक्षामुळे या मार्गाने येणाऱ्या जाणाऱ्यांना सामोरचे काहीच दिसत नाही. अपघात ज्या रस्त्याच्या मोडीवर घडला तिथे झाडे कापण्याची गरज आहे. असे असतानाही याकडे जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाचे लक्ष गेलेले नाही?