शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
3
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
4
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
5
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
6
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
7
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
8
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
9
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
10
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
11
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
12
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
13
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
14
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
15
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
16
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
17
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
18
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
19
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
20
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी शेतीशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 05:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : लाखांदूर तालुका कृषी विभागाच्यावतीने खरीप हंगामातील कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांसाठी शेतीशाळा ...

ठळक मुद्देमहिला अधिकारी शेताच्या बांधावर : पट्टा पद्धत शेतकऱ्यांसाठी फायदेशीर

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लाखांदूर तालुका कृषी विभागाच्यावतीने खरीप हंगामातील कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांसाठी शेतीशाळा कार्यशाळेचे आयोजन लाखांदूर तालुक्यातील चिंचगाव येथे करण्यात आले होते.यावेळी तालुका कृषी अधिकारी, छाया कापगते, मंडळ कृषी अधिकारी बी. ए. शेन्नेवाड, कृषी पर्यवेक्षक एच. के. रामटेके, एस. पी. वरकडे, कृषी सहायक बगमारे, देशमुख, कापगते, शिवनकर, कोटांगले उपस्थित होते.यावेळी तालुका कृषी अधिकारी छाया कपगते यांनी तुडतुडा पिकाने लाखांदूर तालुक्यात गेल्या दोन वर्षात झालेल्या तुडतुड्याच्या नुकसानीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी पट्टा पध्दतीचा अवलंब केल्यास नक्कीच धानपिकावर रोगकिडींचा प्रादुर्भाव कमी होतो, असे मार्गदर्शनातून सांगितले. यावेळी मार्गदर्शनात कापगते यांनी प्रत्यक्ष बाधीत उतरुन धानपिकातील किडींचे प्रात्याक्षिक उपस्थित शेतकऱ्यांना दाखविले.मंडळ कृषी अधिकारी बी. ए. शेन्नेवाड यांनी शेतकऱ्यांना शेतीचे अर्थशास्त्र समजावून शेती हा व्यवसाय यशस्वी करण्यासाठी शेतीला जोडधंदा सुरु करण्याचे आवाहन केले. तरच आपण विषमुक्त शेती पिकवून देशाला सक्षम करु शकतो असे सांगितले. त्यानंतर पर्यवेक्षक एच. के. रामटेके यांनी प्रास्ताविकातून मार्गदर्शन केले.यावेळी काही प्रगतशील शेतकऱ्यांनी स्वत: अनुभव घेतलेल्या पट्टा पध्दतीविषयी अनुभव सांगितले. अशा शेतकऱ्यांना कृषी विभागाच्यावतीने राज्यांतर्गत अभ्यासदौऱ्यासाठी पाठविणार असल्याचेही कापगते यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले. तालुक्यातील पट्टा पध्दतीच्या वाढत्या प्रतिसादाबद्दल रोगकीडींचा प्रादुर्भावही कमी असल्याने उत्पन्नात नक्कीच वाढ होईल असे कार्यशाळेतून सांगितले.कार्यक्रमाला कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, गावातील मंडळीसह, शेतकरी उपस्थित होते. प्रास्ताविक एच. के. रामटेके यांनी तर आभार पर्यवेक्षक एस. पी. वरकडे यांनी मानलेपट्टा पद्धतीचा शेतकºयांना दिलासादरवर्षी लाखांदूर तालुक्यात तुडतुड्याने धानपिकाचे नुकसान टाळण्यासाठी लाखांदूरच्या तालुका कृषी अधिकारी कापगते यांनी तालुक्यातील पट्टा पध्दतीचे क्षेत्र वाढवले अन् हीच पध्दत शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरली असून त्यामुळे कीडरोगाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खर्चात बचत झाली असून शेतकऱ्यांनी कार्यशाळेत पट्टा पध्दतीचे फायदे अनुभवातून सांगितले. त्यामुळे तालुक्यातील पट्टा पध्दतीचे क्षेत्र वाढल्याचे दिसून येते.

टॅग्स :agricultureशेती