शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा योजनेवर शेतकऱ्यांचा आक्रोश

By admin | Updated: September 20, 2014 23:53 IST

बेरडीपार येथे ग्रामस्तरावर कार्यरत असलेल्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या सभेत शेतकऱ्यांनी पीक विम्याच्या लाभासंबंधी लुबाडणूक होत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत.

काचेवानी : बेरडीपार येथे ग्रामस्तरावर कार्यरत असलेल्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या सभेत शेतकऱ्यांनी पीक विम्याच्या लाभासंबंधी लुबाडणूक होत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुखदेव बिसेन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी भूवन कापसे, गणेश कोल्हटकर, गोविंद ठाकरे, मोहपत टेंभेकर, नारायण पटले, नकटू कटरे, जयप्रकाश गौतम, छगनलाल कृपाले, इम्रता पारधी व गीता कटरे प्रामुख्याने उपस्थित होते. प्रास्ताविक गटसचिव आर.एम. पटले यांनी केले. यावेळी शेतकऱ्यांनी विविध सेवा सहकारी संस्थेने सर्व सभासदांना अहवाल पुस्तिका द्यावी, अशी मागणी केली. मागील पाच वर्षांपासून शेतकरी कोणत्या ना कोणत्या संकटात सापडत आहे. पण शासनाने हवे तसे सहकार्य केले नाही. तसेच त्याबाबत संस्थेने पाठपुरावा केल्या नसल्याचा आरोप केला. गेल्या पाच वर्षांपासून पीक विमा योजनेच्या नावावर लाखो रूपये शेतकऱ्यांपर्यंत गडप करण्यात आले. सेवा सहकारी संस्थेने शेतकऱ्यांना लुबाडण्यापूरता दिलासा दिला. मात्र या काळात टंचाई परिस्थिती निर्माण झाल्यावरही पीक विम्याचा लाभ देण्यात आलेला नाही. तसेच संस्थेने शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रयत्न केले नाही. शिवाय विमा कंपनीच्या दलालीत सेवा सहकारी सोसायटी सहभागी असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे. विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या माध्यामाने शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा वेळेवर पुरविण्यात येत असल्या तरी यातून ते कर्जबाजारीच होत आहे. पीक विमा योजना ही फसवेगिरी करणारी योजना असल्याचे शेतकऱ्यांनी बोलून दाखविले. यावेळी माजी उपसरपंच धनराज पटले यांनी शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी व समस्यांवर चर्चा घडवून आणली. आपल्या अध्यक्षीय भाषणात बिसेन यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना सहकार्य करण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. पीक कर्ज प्रत्येक वर्षी देण्यात येते. मागणी करणाऱ्यांना वंचित करण्यात आले नाही. कर्जाची वसुली सर्व सभासदांनी वेळेच्या आत दिल्याने सवलतींचा लाभ मिळेल. तसेच पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. गेल्या दोन वर्षांपासून सेवा सहकारी संस्थेने पीक विमा काढण्याच्या प्रयत्नाकडे दुर्लक्ष केले. ६०० सभासदांपैकी १६० सभासदांनी पीक विमा काढल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी संचालक मंडळासह गावातील ३०० शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)