शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
2
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
4
IPL 2026: वैभव-यशस्वीची धडाकेबाज जोडी फ्लॉप! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला मोठा दिलासा
5
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
6
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
7
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
8
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
9
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
10
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
11
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
12
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
13
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
14
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
15
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
16
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
17
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
18
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
19
सहलीत सेल्फीचा मोह जिवावर बेतला, मावळच्या धरणात तीन मित्र बुडाले; एकाला वाचविण्यात यश
20
...तेव्हाच मुंबई, गोवा ड्रग्जमुक्त होऊ शकेल; इथे दबा धरून बसलेत हजारो सलीम डोला
Daily Top 2Weekly Top 5

धान भाववाढीच्या आदेशाने शेतकऱ्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 05:00 IST

शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी शासनातर्फे जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातर्गंत शासकीय धान खरेदीच्या केंद्राच्या माध्यमातून केली जाते. शासनाने यंदा धानाला १८१५ ते १८३५ रुपये हमीभाव जाहीर केला. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने धानाला ७०० रुपये बोनस जाहीर केला.

ठळक मुद्देतीन महिन्यानंतर आली जाग, हिवाळी अधिवेशनात केली होती घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशना दरम्यान धानाच्या दरात प्रती क्विंटल दोनशे रुपयांनी वाढ करण्याची घोषणा केली होती. मात्र घोषणेला तीन महिन्यांचा कालावधी लोटूनही या संदर्भातील आदेश निघाले नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम कायम होता. अखेर शुक्रवारी (दि.६) शासनाने धानाच्या दरात दोनशे रुपये भाववाढ केल्याचे आदेश काढले. त्यामुळ जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी शासनातर्फे जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातर्गंत शासकीय धान खरेदीच्या केंद्राच्या माध्यमातून केली जाते. शासनाने यंदा धानाला १८१५ ते १८३५ रुपये हमीभाव जाहीर केला. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने धानाला ७०० रुपये बोनस जाहीर केला.तर नागपूर येथील हिवाळी अधिवेशना दरम्यान धानाच्या दरात प्रती क्विंटल २०० रूपयांनी वाढ करण्याची घोषणा केली.बोनस जाहीर केल्याचे आदेश निघाले होते.मात्र दोनशे रुपये दरवाढीचे आदेश घोषणेला तीन महिने होऊनही निघाले नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाचे अधिकारी सुध्दा शेतकऱ्यांना कोणत्या दराने पैसे द्यायचे याबाबत संभ्रमात होते.तर याला घेऊन शेतकऱ्यांची सुध्दा ओरड वाढली होती. अखेर शासनाने शुक्रवारी धानाच्या दरात दोनशे रुपयांनी वाढ केल्याचे आदेश काढले. हे आदेश जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळाला सुध्दा प्राप्त झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.८५ हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभजिल्ह्यातील ८० हजार शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री केली आहे. एकट्या फेडरेशनने आत्तापर्यंत २६ लाख ५२ हजार क्विंटल धानाची खरेदी केली आहे. शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या या सर्व ८० हजार शेतकºयांना या दरवाढीचा लाभ मिळणार आहे.

टॅग्स :agricultureशेती