शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

नुकसान भरपाईमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गाेड; जिल्ह्याला मिळाले २ कोटी ७० लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 05:00 IST

या नुकसान भरपाईपाेटी शासनाने नुकतीच २ कोटी ७० लाख रुपयांची मदत मंजूर केली आहे. या मदतीचे वाटप दिवाळी पूर्व आपदग्रस्तांना वाटप करण्याचे निर्देश दिले आहे. अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निमार्ण होवून १३४५ हेक्टरमधील पिकांचे ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले. भरपाईपोटी शासनाने २ कोटी ७० लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली आहे

ठळक मुद्देदिवाळीपूर्वी रक्कमेचे वाटप करण्याच्या सूचना : प्रती हेक्टरी १० हजार रुपयांप्रमाणे मिळणार नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : यंदा जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर या कालावधीत अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात धान पिकांचे नुकसान झाले होते. तर अतिवृष्टीमुळे घरांची सुध्दा पडझड झाली होती. पुराचा सर्वाधिक फटका गोंदिया व तिरोडा तालुक्यातील ४० गावांना बसला होता. या नुकसान भरपाईपाेटी शासनाने नुकतीच २ कोटी ७० लाख रुपयांची मदत मंजूर केली आहे. या मदतीचे वाटप दिवाळी पूर्व आपदग्रस्तांना वाटप करण्याचे निर्देश दिले आहे. अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निमार्ण होवून १३४५ हेक्टरमधील पिकांचे ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले. भरपाईपोटी शासनाने २ कोटी ७० लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली आहे. अतिवृष्टीमुळे घरांचे सुध्दा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यासाठी ३२ लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली आहे. 

मदतीतून वसूली न करण्याचे आदेशशासनाने अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण होवून झालेल्या नुकसानी करिता २ कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मात्र या निधीतून बॅंकांनी कुठल्याच रक्कमेची वसुुली न करता संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांना देण्याचे निर्देश दिले आहे. या मदतीचे वाटप सुध्दा सुरु झाले आहे. 

पडझड झालेल्या घरांकरिता दीड काेटीजिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूरपरिस्थिती निर्माण होवून घर व गोठ्यांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली होती. यासाठी १ कोटी ५३ लाख ९४ हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली आहे. घरगुती साहित्याचे ३२ लाख ९ हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली आहे. मात्र झालेल्या नुकसानीच्या तुलनेत शासनाकडून मिळालेली भरपाई फार कमी आहे. 

शासनाने अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी मदत मंजूर केली आहे. तहसील कार्यालयाने नुकसानीची रक्कम आली असल्याचे सांगितले. मात्र अजूनपर्यंत आपल्याला नुकसान भरपाईची रक्कम मिळाली नाही.- लिखीराम नागपूरे, शेतकरीलोधीटोला