शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

धानाच्या भाववाढीवरून शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग

By admin | Updated: October 6, 2014 23:13 IST

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनंी रविवारी गोंदियात जाहीर सभा घेतली. तब्बल ४३ वर्षानंतर पंतप्रधानांची सभा गोंदियात होत असल्यामुळे या सभेबद्दल सर्वांनाच अप्रुप होते. विशेषत: धान उत्पादक

मोदींनी टाळला उल्लेख : धान उत्पादकांना दिलासा मिळालाच नाहीगोंदिया : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनंी रविवारी गोंदियात जाहीर सभा घेतली. तब्बल ४३ वर्षानंतर पंतप्रधानांची सभा गोंदियात होत असल्यामुळे या सभेबद्दल सर्वांनाच अप्रुप होते. विशेषत: धान उत्पादक शेतकऱ्यांना पंतप्रधानांकडून मोठी आशा होती. मात्र पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणारे कोणतेही वक्तव्य न केल्यामुळे शेतकऱ्यांचा चांगलाच अपेक्षाभंग झाला आहे. मोदी यांची ही गोंदियातील दुसरी सभा होती. यापूर्वी गुजरातचे मुख्यमंत्री असताना २६ फेब्रुवारी २००९ रोजी ते लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गोंदियात आले होते. त्यावेळी मोदींच्या भाषणाचा प्रभाव फारसा जाणवला नाही, आणि तत्कालीन भाजप उमेदवार तिसऱ्या स्थानावर फेकल्या गेले होते. यावेळी देशाचे पंतप्रधान म्हणून गोंदियात आलेल्या मोदी यांची ही पहिलीच सभा होती. त्यामुळे त्यांच्याकडून सर्व स्तरातील नागरिकांनी अनेक अपेक्षा ठेवल्या होत्या. विशेषत: धानाला उत्पादन खर्चानुसार भाव मिळत नसल्यामुळे आता धान पट्ट्यात आल्यानंतर तरी मोदी धान उत्पादकांची व्यथा समजून घेऊन धानाला योग्य भाव देण्याचे जाहीर करतील, अशी आशा व्यक्त केली जात होती. परंतू मोदींनी आपल्या भाषणात धानाच्या भावाचा उल्लेखही केला नाही.यावेळी बोलताना मोदी म्हणाले, येथील शेतकरी धानाची शेती करतात. परंतू त्यांच्या उत्थानासाठी आतापर्यंतच्या सरकारने काहीही केलेले नाही, असे सांगून राज्यात किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या याचा हिशेब त्यांनी मांडला. परंतू धान उत्पादकांच्या उत्थानासाठी धानाला योग्य भाव दिला जाईल, किंवा धान उत्पादकांसाठी इतर पर्यायी जोडधंदा सुरू करण्यासाठी प्रोत्साहन वगैरे कोणत्याही विषयाला त्यांनी हात घातला नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी नाराजीचा सूर व्यक्त केला.वास्तविक सध्या वाढलेले बियाण्यांचे, खतांचे, कीटकनाशकांचे, मजुरीचे दर पाहता त्या प्रमाणात नव्याने सत्तारूढ झालेले मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार निश्चितपणे धानाच्या हमीभावात चांगली वाढ करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतू यावर्षीच्या हंगामासाठी हमीभावात अवघी ५० रुपये एवढी तुटपुंजी वाढ करण्यात आली आहे. ही वाढ पुरेशी नाही, हे माहीत असतानाही नवीन केंद्र सरकार त्यावर काहीही करायला तयार नसल्यामुळे केंद्र सरकारने आमचा भ्रमनिरास केला, अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. (जिल्हा प्रतिनिधी)