गोंदिया जिल्ह्यात औषध फवारणी केल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 11:12 AM2020-08-25T11:12:41+5:302020-08-25T11:13:08+5:30

तिरोडा तालुक्यातील सातोणा येथील स्वत:च्या शेतात सतत दोन दिवस विषारी औषधाची फवारणी केल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना २४ ऑगस्ट रोजी घडली.

Farmer dies after spraying pesticides in Gondia district | गोंदिया जिल्ह्यात औषध फवारणी केल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

गोंदिया जिल्ह्यात औषध फवारणी केल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया: तिरोडा तालुक्यातील सातोणा येथील स्वत:च्या शेतात सतत दोन दिवस विषारी औषधाची फवारणी केल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना २४ ऑगस्ट रोजी घडली. राजू रामदास रहांगडाले (47) रा सातोना असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

तिरोडा तालुक्यात सतत तीन ते चार दिवस मुसळधार पाऊस पडल्याने औषध मारण्यास उशीर झाल्याने सातोना येथील शेतकरी राजू रामदास रहांगडाले (४७) हे शेतकरी दिनांक २३ रोजी संपूर्ण दिवसभर आपल्या शेतात धान पिकावर औषध मारीत होते. दुसऱ्या दिवशीही ते शेतात गेले होते. शेतात औषध मारुन १२ वाजता घरी परत आल्यावर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने घरचे लोकांनी ताबडतोब उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे उपचाराकरता आणले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना दुपारी २.१५ मिनिटांचे दरम्यान त्यांच्या मृत्यू झाला. याची सूचना उपजिल्हा रुग्णालय तिरोडा तर्फे तिरोडा पोलिसांना देण्यात आल्या वरून तिरोडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली असून पुढील तपास उप पोलीस निरीक्षक अमरसिंग वसावे करीत आहे.

Web Title: Farmer dies after spraying pesticides in Gondia district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.