शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कर्मचाऱ्यांना वेतनाचा फटका

By admin | Updated: December 23, 2015 02:13 IST

शासनाच्या अखत्यारीतील विविध विभागांपैकी सर्वात कमी वेतन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील (एसटी) कर्मचाऱ्यांना मिळत आहे.

वर्षाला तीन टक्के पगारवाढ : पाचव्या वेतन आयोगाशीही तुलना करणे अशक्यदेवानंद शहारे गोंदियाशासनाच्या अखत्यारीतील विविध विभागांपैकी सर्वात कमी वेतन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील (एसटी) कर्मचाऱ्यांना मिळत आहे. एकीकडे इतर सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचे वेध लागले असताना एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन मात्र पाचव्या वेतन आयोगाएवढेही नाहीत. दिवसेंदिवस महागाई अवाक्याबाहेर जात असताना एसटी कर्मचाऱ्यांना तोकड्या वेतनात संस्काराचा गाडा हाकणे कठीण झाले आहे.एसटी कर्मचाऱ्यांना कोणताही वेतन आयोग लागू नाही. दरवर्षी केवळ तीन टक्के पगारवाढ दिली जाते. चतुर्थ श्रेणी व द्वितीय श्रेणीच्या कर्मचाऱ्यांना १२ ते २२ हजारापर्यंत वेतन दिले जाते. वास्तविक आंध्रप्रदेश व तेलंगाणा राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना याच्या तिप्पट वेतन दिले जाते. त्यामुळे एसटी कामगारांच्या वेतनाबाबत महाराष्ट्र १५ वर्षे मागे आहे. वीज कंपन्यांमधील कामगारांपेक्षाही एसटी महामंडळ कमी वेतन देत असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कामगारांच्या पगारवाढीच्या झालेल्या करारात अनेक त्रुटी दिसत असून अनेक प्रश्नसुद्धा प्रलंबित ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे कामगारांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. त्यांच्यात मोठ्या प्रमाणात असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळेच कामगारांनी १७ डिसेंबरपासून संप पुकारला होता. राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी विधानसभेत त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिल्यानंतर एसटी वर्कर्स काँग्रेसने आंदोलन मागे घेतले. वेतनवाढीची मागणी पूर्ण करण्यासाठी वेळ लागेल, अशी माहिती सहायक कामगार आयुक्त यांनी दिली आहे. आश्वासनांमुळे काहीही होत नसल्याची भावना आता एसटी कामगारांमध्ये आहे. महागाई दिवसेंदिवस वाढत असून कुटुंबाच्या गरजा भागविणे एसटी कामगारांना कठिण झाले आहे.