जातनिहाय जनगणनेसाठी जनगणनेवर बहिष्कार घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 06:00 AM2020-02-19T06:00:00+5:302020-02-19T06:00:29+5:30

सध्याच्या काळात सर्वप्रकारच्या सुविधा उपलब्ध असताना ओबीसींची जनगणना करण्यास सरकार टाळाटाळ करूण या प्रवर्गातील जातींच्या विकासात अडसर निर्माण करीत आहे. त्यामुळे आपली जातनिहाय जनगणना सरकारने करावी यासाठी दबावगट निर्माण करण्यासाठी समाजबांधवानी संघटित होऊन जनगणना सरकार करत नसेल तर त्यावर बहिष्कार घालत घरी आलेल्या प्रगणकाला परत पाठविण्याची तयारी समाजबांधवांनी ठेवावी असे राष्ट्रीय पोवार क्षत्रिय महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी ठाम सांगीतले.

Exclude census for caste-based census | जातनिहाय जनगणनेसाठी जनगणनेवर बहिष्कार घाला

जातनिहाय जनगणनेसाठी जनगणनेवर बहिष्कार घाला

googlenewsNext
ठळक मुद्देपदाधिकाऱ्यांचा सूर : पोवारी महासभेची मुर्री व फुलचूर येथे सभा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : स्वातंत्र्यपूर्व काळात सुविधांचा अभाव असताना इंग्रज १९३१ मध्ये या देशातील नागरिकांची जातीनिहाय जनगणना करू शकतात. तर सध्याच्या काळात सर्वप्रकारच्या सुविधा उपलब्ध असताना ओबीसींची जनगणना करण्यास सरकार टाळाटाळ करूण या प्रवर्गातील जातींच्या विकासात अडसर निर्माण करीत आहे. त्यामुळे आपली जातनिहाय जनगणना सरकारने करावी यासाठी दबावगट निर्माण करण्यासाठी समाजबांधवानी संघटित होऊन जनगणना सरकार करत नसेल तर त्यावर बहिष्कार घालत घरी आलेल्या प्रगणकाला परत पाठविण्याची तयारी समाजबांधवांनी ठेवावी असे राष्ट्रीय पोवार क्षत्रिय महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी ठाम सांगीतले.
तालुक्यातील मुर्री व फुलचुर येथे राष्ट्रीय पोवार क्षत्रिय महासभेच्यावतीने सभा घेण्यात आली. यातील ग्राम मुर्री येथील सभेच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य संजय टेंभरे होते. उदघाटन पोवार क्षत्रिय महासभेचे अध्यक्ष इंजि.मुरलीधर टेंभरे यांच्या हस्ते करण्यात आले. तर फुलचूर येथील सभेच्या अध्यक्षस्थानी युवा समितीचे अध्यक्ष प्रल्हाद पटले होते. उद्घाटन पोवार क्षत्रिय संघटन पौंडीचे अध्यक्ष शरणागत यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कुमेश्वर भगत, अ‍ॅड.राजकुमारी कटरे, राजेश अंबुले, पप्पू पटले, नेतराम गौतम, प्रवेश बिसेन, अशोक हरिणखेडे, कुलदिप रिनायत, सरपंच ओंकार रहांगडाले, भुवन रिनायत, माजी सभापती स्नेहा गौतम, पुस्तकला पटले, पवार प्रगतीशील मंचचे अध्यक्ष अ‍ॅड.पृथ्वीराज चव्हाण, राजेश चव्हाण, के.एल.बिसेन, जी.पी.बिसेन, एम.ए.ठाकूर, शिशिर कटरे, दुर्गेश रहागंडाले, दिनेश हरिणखेडे, महेंद्र बिसेन, मनोज टेंभरे, टी.डी.बिसेन, सुभान रहागंडाले, लक्ष्मी कटरे, महेश अंबुले, देवचंद बिसेन, गुणराज ठाकरे, सुनिता बघेले, संतोष चौधरी, बी.एल.पटले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सभांसाठी महेंद्र पारधी, अमर पटले, भुपेंद्र बघेले, सुखचंद येळे, महेश कटरे, पप्पू बिसेन, सुनील कटरे, राजकुमार बघेले, मनिष बघेले, प्रदिप टेंभरे, देवेंद्र गौतम, संदिप येडे, मितेश पटले, आनंद येडे, मनोज रहागंडाले, ईशा गौतम, सुनिता ठाकरे, सरस्वती रहागंडाले, रु पाली अंबुले, ज्योती बघेले, नीशा पटले, विनता बिसेन आदिंनी सहकार्य केले.

Web Title: Exclude census for caste-based census

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.