शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

आठ महसूल मंडळात अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 05:00 IST

हवामान विभागाने जिल्ह्यात बुधवारपासून तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. तो अंदाज काहीसा खरा देखील ठरला आहे. बुधवारी (दि.५) सायंकाळपासूनच जिल्ह्यात सर्वत्र पावसाची रिपरिप कायम होती. रात्रीच्या सुमारास गोंदिया,आमगाव,गोरेगाव या तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. त्यामुळे या तिन्ही तालुक्यातील नदी, नाले भरुन वाहत होते.

ठळक मुद्देदोन तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद : उर्वरित तालुक्यांना मात्र प्रतीक्षा कायम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील दोन महिन्यांपासून दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या गोंदिया जिल्हावासीयांना गेल्या २४ तासात पडलेल्या पावसाने थोडा दिलासा मिळाला असून १५६२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आठ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून गोरेगाव आणि आमगाव तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. मात्र उर्वरित सहा तालुक्यातील शेतकऱ्यांना अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.हवामान विभागाने जिल्ह्यात बुधवारपासून तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. तो अंदाज काहीसा खरा देखील ठरला आहे. बुधवारी (दि.५) सायंकाळपासूनच जिल्ह्यात सर्वत्र पावसाची रिपरिप कायम होती. रात्रीच्या सुमारास गोंदिया,आमगाव,गोरेगाव या तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. त्यामुळे या तिन्ही तालुक्यातील नदी, नाले भरुन वाहत होते.आमगाव-कालीमाटी मार्गावरील नाल्याच्या पुलावरुन पाणी वाहत असल्याने हा मार्ग काही तासांसाठी बंद झाला होता. तर आमगाव शहरातील काही वस्त्यांमध्ये सुध्दा पाणी साचल्याने नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागले.गोरेगाव येथे वार्ड क्रमांक १३ मध्ये नगर पंचायतच्या चुकीच्या बांधकामामुळे पाणी साचल्याने वार्डातील नागरिकांची गैरसोय झाली. मात्र पावसामुळे या तिन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.पावसाअभावी हजारो हेक्टरवरील रोवणी खोळंबली होती. तर केलेली रोवणी सुध्दा वाळण्याच्या मार्गावर होती यामुळे शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र बुधवारी झालेल्या पावसामुळे शेतकºयांना थोडा दिलासा मिळाला आहे.अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी, तिरोडा, देवरी आणि सालेकसा तालुक्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाल्याने या तालुक्यातील नागरिकांना अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.या महसूल मंडळात झाली अतिवृष्टीगेल्या २४ तासात गोंदिया तालुक्यातील कामठा महसूल मंडळात ७६ मिमी, गोरेगाव तालुक्यातील गोरेगाव १७१.२० मिमी, कुºहाडी १६२.६० मिमी, मोहाडी ११०.१० मिमी तर आमगाव तालुक्यातील कट्टीपार १५१ मिमी, आमगाव १०९ मिमी, तिगाव ९८.८० मिमी, १३० मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर आमगाव १२२.२० मिमी, गोरेगाव तालुक्यात सर्वाधिक १४७.९७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.पऱ्ह्यांना संजीवनी, रोवणीच्या कामाला वेगपावसाअभावी मागील महिनाभरापासून रोवणीची कामे पूर्णपणे खोळंबली होती. बुधवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या पावसामुळे करपण्याच्या मार्गावर असलेल्या पऱ्ह्यांना संजीवनी मिळाली. आमगाव, गोरेगाव, सडक अर्जुनी आणि गोंदिया तालुक्यातील रोवणीच्या कामाला वेग आला आहे. आतापर्यंत सर्वात कमी पावसाची नोंद अर्जुनी मोरगाव तालुक्यात झाली असून येथील शेतकऱ्यांना अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे.

टॅग्स :Rainपाऊस