शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 05:00 IST

जिल्ह्यात कोरोना बाधित २ रूग्णांचा मृत्यू झाल्यानंतर जिल्हावासीयांना सुरक्षात्मक उपाययोजनांबाबत माहिती देताना त्या बोलत होत्या. यांतर्गत, जिल्ह्यात सक्रीय कोरोना बाधित रूग्ण ५२ असून दुर्दैवाने २ रूग्णांचा मृत्यू झाला असल्याचे सांगत त्यांनी,२ रूग्णांच्या मृत्यू मागची कारणे शोधली असता ते दोन्ही रूग्ण ६० वर्षांवरील होते. त्यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे आजार होते व त्यांनी उपचाराला उशीर केला.

ठळक मुद्देकादंबरी बलकवडे। जिल्हावासीयांना दिली उपाययोजनांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. या काळात प्रत्येक व्यक्तीने आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व नागरिकांच्या सहकार्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्ष डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले.जिल्ह्यात कोरोना बाधित २ रूग्णांचा मृत्यू झाल्यानंतर जिल्हावासीयांना सुरक्षात्मक उपाययोजनांबाबत माहिती देताना त्या बोलत होत्या. यांतर्गत, जिल्ह्यात सक्रीय कोरोना बाधित रूग्ण ५२ असून दुर्दैवाने २ रूग्णांचा मृत्यू झाला असल्याचे सांगत त्यांनी,२ रूग्णांच्या मृत्यू मागची कारणे शोधली असता ते दोन्ही रूग्ण ६० वर्षांवरील होते. त्यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे आजार होते व त्यांनी उपचाराला उशीर केला. जर कुणाला काही आरोग्यविषयक तक्रारी असतील तसेच कोरोनाशी संबंधित काही लक्षणे दिसत असतील तर त्यांनी जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालय, जिल्हा सामान्य रूग्णालय तसेच कोरोनासाठी असलेल्या हेल्पलाइनशी संपर्क साधावा. आरोग्य तपासणी करण्यास व संपर्क करण्यास कोणत्याही प्रकारे विलंब करू नये असे सांगीतले.तसेच कोरोना बाधित रूग्णांमध्ये जिल्ह्यात लहान मुले देखील बाधित असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या संसर्ग काळात लहान बालकांना खेळण्यासाठी बाहेर इतरत्र पाठवू नये. १० वर्षांच्या आतील सर्व बालके आणि ६० वर्षांवरील व्यक्तींची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कोरोनाची संसर्ग साखळी तोडावी लागणार आहे. ही संसर्ग साखळी इथेच तोडली नाही तर भविष्यात वेगाने कोरोनाचा फैलाव होणार आहे. जिल्ह्यात बाधित रूग्णांपैकी १ जो बाधित रूग्ण आढळून आला आहे त्याच्या संपर्कातील व्यक्तींपैकी ३७ व्यक्ती बाधित असल्याचे आढळून आले आहे.अद्यापही १९० व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुन्यांचा चाचणी अहवाल प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगीतले. जिल्हा प्रशासन जिल्ह्यातील व्यक्तीला कोरोनाची बाधा पोहोचू नये यासाठी दिवसरात्र मेहनत घेत आहे.जिल्ह्याला कोरोनावर मात करायची असेल तर जिल्ह्यातील सर्व नागरिकांचे सहकार्य व त्यांची सकारात्मक भूमिका आवश्यक असून नागरिकांनी यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असेही त्यांनी कळविले.नियम तोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईयाप्रसंगी डॉ. बलकवडे यांनी, ४ जुलैपासून एक विशेष मोहीम जिल्ह्यात सुरू केली असून जे व्यक्ती चेहरा व नाकावर मास्क किंवा रूमाल बांधणार नाही. तसेच एखाद्या ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करता गर्दी करतील अशांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येकाने घराबाहेर पडताना चेहरा व नाकावर मास्क किंवा रूमाल वापरावा, गर्दी करू नये आवश्यकता नसताना घराबाहेर पडू नये असेही सांगीतले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारी