शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
2
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
3
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
6
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
7
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
8
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
9
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
10
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
11
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
12
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
13
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
14
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
15
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
16
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
17
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
18
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
19
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
20
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

सायबर सुरक्षेबाबत प्रत्येकाने जागरुक रहावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : दिवसेंदिवस सायबर गुन्ह्यांत वाढ होत चालली आहे. महिला व बालकांवरील अत्याचार देखील वाढले आहेत. ...

ठळक मुद्देसंडे अँकर । जगदिश पांडे : सायबर सेफ वूमन अंतर्गत कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दिवसेंदिवस सायबर गुन्ह्यांत वाढ होत चालली आहे. महिला व बालकांवरील अत्याचार देखील वाढले आहेत. यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून प्रत्येकाने दक्ष राहणे गरजेचे असून तसेच सायबर सुरक्षिततेबाबत देखील प्रत्येकाने जागरु क रहावे असे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी जगदिश पांडे यांनी केले.जिल्हा पोलीस विभागाच्यावतीने पोलीस मुख्यालयाच्या प्रेरणा सभागृहात शुक्रवारी (दि.३) ‘सायबर सेफ वूमन’ मोहिमेंंतर्गत आयोजित महिला-बालकांवरील अत्याचार व सायबर गुन्हे रोखण्यासाठी जनजागृती कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी पोलीस निरीक्षक राहूल शिरे, नगरसेविका अ‍ॅड. हेमलता पतेह, संगीता घोष, पूजा तिवारी, प्रमिला सिंद्रामे, नगर परिषदेच्या माजी सभापती भावना कदम, अपुर्व मेठी, गजेंद्र फुंडे व असाटी प्रामुख्याने उपस्थित होते.प्रारंभी ‘सायबर साक्षरता ही काळाची गरज आहे’ याबाबत व्हिडिओ क्लीप दाखिवण्यात आली. शिरे यांनी, महिला व बालकांबाबतचे गुन्हे, लैंगिक अत्याचार आणि फसवणूक यासाठी सर्रास इंटरनेटचा वापर होत असल्यामुळे त्यावर आपण काय उपाय केले पाहिजे याबाबत पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशनद्वारे विस्तृत माहिती दिली. अ‍ॅड. पतेह यांनी, इंटरनेट किंवा मोबाईल हाताळताना सावध राहण्याची गरज आहे. मुलांना लहान वयातच चांगले संस्कार दिले पाहिजे. गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी महिला व बालकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे असे सांगितले. घोष यांनी, सायबर गुन्हे कमी करण्यासाठी पोलीस विभागातील सायबर सेलची मदत घेण्यात यावी. मोबाईलचा वापर करताना सावधगिरी बाळगायला पाहिजे, यासाठी आई-वडिलांची जबाबदारी आहे असे सांगितले.फुंडे यांनी, सामाजिक गुन्हेगारीला दूर करण्यासाठी सायबर सेलची आवश्यकता आहे.समाजशील चांगली कामे करुन समाजाला उन्नतीकडे न्यावे असे सांगितले. प्रभाकर पालांदूरकर यांनी सोशल मीडियाचा वापर करताना आपण काय दक्षता घ्यायला पाहिजे याबाबत विस्तृत माहिती दिली. चाईल्ड लाईफ संस्थेचे अशोक बेडेकर यांनी १०९८ यावर फोन केल्यास नक्कीच आपल्याला मदत मिळेल असे सांगितले.संचालन संजय मारवाडे यांनी केले. आभार शिरे यांनी मानले. कार्यक्र माला शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थिनी, शिक्षिका, विविध स्वयंसेवी संस्थांच्या महिला प्रतिनिधी, पोलीस ठाण्यातील महिला दक्षता समितीच्या महिला सभासद तसेच मुलांचे पालक मोठ्या संख्येत उपस्थित होते. कार्यक्रमासाठी गोंदिया पोलीस दलाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम