शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

नऊ वर्षानंतरही बेवारटोला हत्याकांडाच्या जखमा ओल्या

By admin | Updated: May 30, 2014 00:09 IST

सालेकसापासून पूर्वेस २२ कि.मी.वर बेवारटोला परिसरात ३0 मे २00५ ला घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटाने नक्षलवाद्यांनी पहिल्यांदाच गोंदिया जिल्ह्याला मोठा हादरा दिला होता. त्यात ९ पोलीस कर्मचारी

३0 मे २00५ ची घटना : १0 पोलीस जवानांचा घेतला होता बळीनामदेव हटवार - सालेकसासालेकसापासून पूर्वेस २२ कि.मी.वर बेवारटोला परिसरात ३0 मे २00५ ला घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटाने नक्षलवाद्यांनी पहिल्यांदाच गोंदिया जिल्ह्याला मोठा हादरा दिला होता. त्यात ९ पोलीस कर्मचारी आणि एका खासगी वाहन चालकाचा बळी गेला. या घटनेला शुक्रवारी ९ वर्षे होत आहेत. मात्र या दुर्घटनेतून वाचलेल्या पोलीस कर्मचार्‍यांच्या अंगावर अजूनही त्या घटनेच्या आठवणीने काटा उभा राहिल्याशिवाय राहात नाही.बेवारटोला गावाजवळ बेवारटोला जलाशयाचे काम सुरू होते. बेवारटोला हा परिसर जंगलव्याप्त असून नक्षलवाद्यांचा वावर असलेला परिसर आहे. शासनाच्या मंजुरीनंतर येथे तलावाचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. येथील बांधकामासाठी दगड फोडण्याचे काम नेहमीप्रमाणे सुरू होते. दगड फोडण्यासाठी स्फोटकांची आवश्यकता होती. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी दरेकसा येथील एओपीचे (आर्म्स आऊट पोस्ट) पोलीस गार्ड पुरविण्यात आले होते. ३0 मे २00५ ला ब्लास्टिंगचे काम करण्याचे ठरल्यामुळे पोलीस कर्मचारी सोबतीला देण्यात आले होते. ब्लास्टिंगचे काम संपल्यानंतर दुपारी ४.३0 वाजताच्यादरम्यान पोलीस पार्टी परत येण्यासाठी क्वॉलिस गाडी (एमएच ३१/ए.एच २४९0) आणि एक्सप्लोझिव्ह व्हॅन (एमएच ३५/९३४) मध्ये बसून निघाले असताना बेवारटोला बंजारी रस्त्यावर भूसुरुंगाद्वारे स्फोट करण्यात आला. पोलीस विभागाच्या हालचालीवर नियंत्रण ठेवून अगोदरच नक्षलवाद्यांनी रचलेल्या कटानुसार हा भयानक स्फोट झाला. क्वालिस गाडी खेळण्यातल्या गाडीसारखी हवेत उंच उडाली आणि तिचे तुकडे तुकडे झाले. सोबतच नक्षल्यांकडून बेधुंद गोळीबार झाला.या घटनेत २ पोलीस उपनिरीक्षक, ७ पोलीस कर्मचारी व १ खासगी वाहन चालक अशा १0  जणांचा बळी गेला. दोन पोलीस गंभीर  जखमी होऊन या हत्याकांडातून वाचले. यावेळी नक्षलवाद्यांनी पोलिसांकडील ७ एसएलआर, ४ एके रायफल, ग्रेनेट, वॉकीटाकी, काडतूस व इतर साहित्य लुटून नेले. एक्सप्लोसिव्ह व्हॅनमधील सोलर प्राईम पेटी २४ किलो आणि सुपर पावरगो जिलेटिन १ पेटी २५ किलो असा २५00 रुपयांचा ऐवजही पळवून नेला. गोंदिया जिल्ह्यात नक्षलवादी सक्रिय झाल्यानंतर त्यांनी घडवून घडवून आणलेली ही पहिलीच मोठी हिंसक कारवाई होती. त्या घटनेपासून जिल्ह्यात नक्षल्यांची दहशत आणखीच वाढली. ती आजही कायम आहे.या भूसुरुंग स्फोटाच्या घटनेला नऊ वर्षे झाली तरी प्रत्यक्षदशर्र्ींना अजूनही ती घटना ताजी असल्यासारखे वाटते. नशीन बलवत्तर होते म्हणून आपले प्राण या भयानक घटनेतून वाचले, असे दोन्ही प्रत्यक्षदश्री सांगतात. या घटनेनंतर पोलिसांनी तीव्र नक्षली भागात गस्त करताना काळजी घेणे सुरू केल्यामुळे जिल्ह्यात पुन्हा भुसुरूंगासारख्या घटना घडवून आणण्यात नक्षल्यांना यश आले नाही. परंतू नक्षल्यांनी तसे प्रयत्न मात्र जरूर केले आहेत. काही महिन्यांपूर्वी नक्षल्यांनी पेरून ठेवलेले भुसूरंग पोलिसांनी जप्त करून नक्षल्यांचा डाव उधळून लावला आहे.