शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना व्यवस्थापनासाठी टास्क फोर्सची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 05:00 IST

जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण वाढले असूनही फक्त मोजकेच उपचारात आहेत. अशात कोरोनाचे व्यवस्थापन करण्यासाठी रूग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर्सला मार्गदर्शन करणे गरजेचे असून यासाठी टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. या टास्क फोर्समध्ये विविध शाखांतील तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला आहे.

ठळक मुद्देउपचार करणाऱ्या डॉक्टर्सला करणार मार्गदर्शन : विविध शाखांतील तज्ज्ञांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण वाढले असूनही फक्त मोजकेच उपचारात आहेत. अशात कोरोनाचे व्यवस्थापन करण्यासाठी रूग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर्सला मार्गदर्शन करणे गरजेचे असून यासाठी टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. या टास्क फोर्समध्ये विविध शाखांतील तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला आहे.राज्याच्या टोकावर तसेच मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्याच्या सीमेवर असलेल्या आदिवासी, नक्षलग्रस्त व अतिदुर्गम असलेला गोंदिया जिल्हा तिसऱ्यांदा करोना मुक्तीच्या वाटेवर आहे. मात्र सातत्याने वाढ होत असलेली रूग्ण संख्या बघता कोरोनाचे व्यवस्थापन करणे गरजेचे झाले आहे.यासाठी रूग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर्सला वेळोवेळी मार्गदर्शन करणे सुद्धा गरजेचे आहे. यातूनच जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी जिल्ह्यात स्थापन केलेल्या कोविड केअर सेंटरसाठी स्पेशल टास्क फोर्सची स्थापना करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. हिम्मत मेश्राम यांच्या संकल्पनेतून या स्थापित करण्यात आलेल्या या जिल्हास्तरीय टास्क फोर्समध्ये मेडीसिन भिषकतज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, सर्जन्स, युरोसर्जन्स, न्युरॉलॉजीस्ट, मनोविकारतज्ञ, नेत्रतज्ञ, शरीरविकृती शास्त्रज्ञ, हिमॅटॉलॉजीस्ट यांचा समावेश करण्यात आला आहे. कोवीड बाधित रुग्णांवर उपचार करताना त्यांना कोरोना सोबतच उच्चरक्तदाब, शुगर, हार्ट प्रॉब्लेम, मधूमेह इतर आजार असल्यास त्याचे त्वरित निदान करुन उपचार करण्यात येतो.रूग्णांच्या कोविड केअर सेंटरमध्ये २४ तास ७ ही दिवस ड्यूटी करणाऱ्या डॉक्टरांना या जिल्हास्तरीय टास्क फोर्सचे मार्गदर्शन मिळत असून त्यामुळेच जिल्ह्यात १०४ रूग्ण बाधित असूनही १०२ रूग्ण बरे होऊन घरी गेलेत. तसेच एकाही रूग्णाचा मृत्यू झालेला नाही.टास्क फोर्समध्ये यांचा समावेशयेथील क्रीडा संकुल, पॉलीटेक्नीक कॉलेज व आयुर्वेदिक कॉलेज या ३ कोवीड केअर सेंटरमध्ये रूग्णांवर उपचार करणाºया डॉक्टरांना मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हास्तरीय टास्क फोर्सची स्थापना करण्यात आलेली आहे. या जिल्हास्तरीय टास्क फोर्समध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मेडिसीन विभाग प्रमुख डॉ. प्रशांत पाटील, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. देशमुख, सर्जन्स डॉ. मनिष सिंग, डॉ. प्रशांत तुरकर, आसीसीयू तज्ज्ञ डॉ. विनोद मोहबे, डॉ. राजेंद्र वैद्य, नेत्रतज्ञ डॉ. निकिता पोयाम, डॉ. संजय माहुले, डॉ. सुवर्णा हुबेकर, डॉ. अविनाश येरणे, डॉ. यामिनी येळणे आदिंचा समावेश असून ते सेवा देत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या