शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणधारक शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्यास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 05:00 IST

गेल्या वर्षीच्या दोन्ही हंगामातील अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची धान खरेदी करण्यात आली. मात्र यंदा धान खरेदी न करण्याचे कारण काय असा प्रश्न निर्माण होत आहे. येत्या चार-पाच दिवसांत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांकडून महामंडळाने धान खरेदी करण्यास सुरुवात न केल्यास या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा विनोद पाटील गहाणे, योगेश नाकाडे, चेतन दहीकर, दिनेश पाटील रहांगडाले यांनी दिला आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांनी दिला आंदोलनाचा इशारा

    लाेकमत न्यूज नेटवर्ककेशोरी :  या वर्षीच्या खरीप हंगामातील धान खरेदी करण्यासाठी आदिवासी विकास महामंडळाने परिसरातील केशोरी, गोठणगाव, इळदा येथील विविध कार्यकारी संस्थेच्यामार्फत शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करुन धान् खरेदीस सातबारा घेवून सुरुवात केली आहे. परंतु या तिन्ही धान खरेदी केंद्रावर अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची धान खरेदी केली जात नसल्यामुळे अतिक्रमणधारक शेतकरी अडचणीत आले आहे. गेल्या वर्षीच्या दोन्ही हंगामातील अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची धान खरेदी करण्यात आली. मात्र यंदा धान खरेदी न करण्याचे कारण काय असा प्रश्न निर्माण होत आहे. येत्या चार-पाच दिवसांत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांकडून महामंडळाने धान खरेदी करण्यास सुरुवात न केल्यास या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा विनोद पाटील गहाणे, योगेश नाकाडे, चेतन दहीकर, दिनेश पाटील रहांगडाले यांनी दिला आहे. अर्जुनी-मोरगाव तालुक्यांतर्गत येणाऱ्या केशोरी परिसरात खरीप हंगामात निघालेले धान खरेदी करण्यासाठी आदिवासी विकास महामंडळाने केशोरी, गोठणगाव, इळदा हे तिन्ही शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु केले आहे. धान खरेदीसाठी ऑनलाईन पध्दतीचा सातबारा असणे अनिवार्य केले आहे. परंतु त्या सातबारामध्ये अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची नावे येत नाही. सरकारी जागा अशी नोंद येत असल्यामुळे शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान विक्री करण्यासाठी अतिक्रमणधारक शेतकऱ्यांना अडचण निर्माण झाली आहे. मागील वर्षी अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची धान खरेदी करण्यासाठी कोणतीही अडचण निर्माण न करता धान खरेदी करण्यात आली होती. मग यावर्षीच धान खरेदी नकार घंटा का? असा सवाल अतिक्रमणधारक शेतकऱ्यांनी केला आहे. या परिसरातील अनेक अतिक्रमणधारक शेतकऱ्यांसमोर धान विक्रीचे संकट निर्माण झाले आहे.निर्णय घेण्यास विलंब या संदर्भात काही शेतकऱ्यांनी उपप्रादेशिक अधिकारी नवेगावबांध यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधला असता लवकरच धान खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात येईल असे सांगीतले होते. परंतु तब्बल आठ दिवस लोटूनही धान खरेदीचा निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत येवून महामंडळाविषयी संताप व्यक्त करीत आहेत. येत्या चार दिवसात व्यवस्थापकीय अधिकारी यांनी अतिक्रमण धारक शेतकऱ्यांची धान खरेदीचा निर्णय घेतला नाही तर महामंडळाच्या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड