शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
13
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
14
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
15
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
16
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
17
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

रोजगार सेवकाने केली ५०० रूपयांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 05:01 IST

रोजगार सेवक किशोर शेंडे हा त्यांच्या घरी गेला. त्याने तक्रारदारास घरकुल व बँक खात्या संबंधीत कागदपत्र आणून देण्यास सांगत मजुरांच्या मजुरीचे पैसे काढून देण्यासाठी ५०० रूपयांची मागणी केली. यावर तक्रारदारांनी २९ जानेवारी २०२० रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार नोंदविली.

ठळक मुद्देग्राम चारगाव येथील प्रकरण : बांधकाम मजुरांचे पैसे देण्यासाठी मागितले

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : घरकुल बांधकाम करणाऱ्या मजुरांचे मजुरी काढण्याचे काम करुन देण्यासाठी ५०० रूपयांची मागणी करणाऱ्या रोजगार सेवकावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा नोंद केला आहे. सोमवारी (दि.२०) ही कारवाई करण्यात आली असून किशोर शेंडे असे लाचखोर रोजगार सेवकाचे नाव आहे.तक्रारदार या मजूर असून त्यांच्या वडिलांच्या नावाने सन २०१८-१९ मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर झाले आहे. यासाठी त्यांना २० हजार रूपयांचा पहिला हप्ता मिळाला आहे.अशात २८ जानेवारी रोजी रोजगार सेवक किशोर शेंडे हा त्यांच्या घरी गेला. त्याने तक्रारदारास घरकुल व बँक खात्या संबंधीत कागदपत्र आणून देण्यास सांगत मजुरांच्या मजुरीचे पैसे काढून देण्यासाठी ५०० रूपयांची मागणी केली. यावर तक्रारदारांनी २९ जानेवारी २०२० रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार नोंदविली.तक्रारीच्या आधारे पथकाने ३० जानेवारी रोजी पडताळणी केली असता रोजगारसेवक शेंडे याने पंचांसमक्ष पुन्हा तक्रारदारास ५०० रूपयांची मागणी केली. प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (दि.२०) शेंडे यांच्यावर रावणवाडी पोलीस ठाण्यात लाच लुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ कलम ७ (सुधारित अधिनियम २०१८) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

टॅग्स :Socialसामाजिक