शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

दारुबंदीसाठी महिलांचा एल्गार

By admin | Updated: October 5, 2015 02:06 IST

गांधी जयंतीनिमित्त सानगडी येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. गावातील वैध तसेच अवैध दारुचे दुकान बंद करण्याकरिता ग्रामसभेत ठराव मंजूर करण्यात येणार होता.

सानगडीतील प्रकार : शासनाच्या आदेशाला केराची टोपली, पण ग्रामसभा नाहीपुरूषोत्तम डोमळे सानगडीगांधी जयंतीनिमित्त सानगडी येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. गावातील वैध तसेच अवैध दारुचे दुकान बंद करण्याकरिता ग्रामसभेत ठराव मंजूर करण्यात येणार होता. मात्र ग्रामविस्तार अधिकारी यांनी ग्रामसभेला दांडी मारल्याने विशेष ग्रामसभा होऊ शकली नाही. दोन दिवसांपूर्वीच दारुबंदीसाठी शेकडो महिलांनी कंबर कसून ग्रामसभेवर धडक दिली होती, हे विशेष.गणराज्य दिन, स्वातंत्र्य दिन व गांधी जयंती निमित्त विशेष ग्रामसभेचे आयोजन करुन गांव विकासाचे निर्णय द्यावे असा शासनाचा नियम आहे. मात्र ग्राम सभा न झाल्याने शंका कुशंकाना ऊत आला आहे. अवैध व वैध दारु विक्रेत्यांनी संगनमत करुन ग्रामसभा होवू दिली नाही, अशी सानगडीवासियांत चर्चा आहे. आदर्श गांव घडविण्याकरिता सरपंच- सचिव तसेच ग्रामपंचायत सरपंचा सह सदस्यांनी प्रेरीत करने आवश्यक आहे. मात्र सानगडीत उलट परिस्थीती पाहावयास मिळाली. ग्रामविस्तार अधिकारीच सभेला उपस्थित न राहिल्याने सभा तहकूब करण्यात आली. सरपंचानी ठरलेल्या विषयावर चर्चा न करता नाही. राज्याच्या ग्रामविकास मंत्र्यांनी २ आॅक्टोंबरला विशेष ग्रामसभा घेवून सुंदर व स्वच्छ गावाचे स्वप्न साकारण्याचे आवाहन केले. बरगळेली ग्रामसभा १० आॅक्टोबरला ठेवण्यात आली आहे. दारुबंदीसाठी एल्गार पुकारलेल्या महिलांनी हिंमत न हारता होणाऱ्या ग्रामसभेला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून दारुबंदीचा ठराव पारित करावा. आमिषाला बळी न पडता गावातील सुज्ञ नागरिकांनी महिलांना पाठिंबा द्यावा अशी जनसामान्यात चर्चा आहे. तंटामुक्ती गाव समिति, गणेश मंडळ, दुर्गा देवी मंडळांनी सुध्दा तसेच भागवत सप्ताह आयोजकांनी सुध्दा गावाच्या विकासाकडे लक्ष देवून दारुबंदीसाठी एल्गार पुकारलेल्या महिलांना सहकार्य करण्याची गरज निर्माण झाली आहे.