शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

आठ सहकारी संस्थांची होणार निवडणूक

By admin | Updated: February 7, 2015 23:26 IST

गेल्या ३१ आॅक्टोबर २०१४ पुर्वी संचालक मंडळांचा कार्यकाळ संपलेल्या जिल्ह्यातील आठ सहकारी संस्थांची निवडणूक घेतली जाणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्य सहकारी निवडणूक

गोंदिया : गेल्या ३१ आॅक्टोबर २०१४ पुर्वी संचालक मंडळांचा कार्यकाळ संपलेल्या जिल्ह्यातील आठ सहकारी संस्थांची निवडणूक घेतली जाणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधीकरणद्वारे ही निवडणूक घेतली जाणार असून या प्राधीकरणाकडून घेतली जात असलेली ही जिल्ह्यातील पहिलीच निवडणूक राहणार आहे. लवकरच या सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम घोषीत केला जाणार आहे. १९९७ च्या घटना दुरूस्तीनुसार आता सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधीकरणची स्थापना करण्यात आली आहे. त्यानुसार आता सहकारी संस्थांच्या निवडणुका प्राधीकरणच्या माध्यमातूनच घेतल्या जाणार असून जिल्ह्यातील त्यांची ही पहिलीच वेळ ठरणार आहे. प्राधीकरणने यासाठी काही नियम तयार केले असून संस्थांची अ, ब, क व ड या चार प्रकारात विभागणी केली आहे. याती अ गटात- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. ब गटात- नागरी बँक, १० लाखांपेक्षा जास्त भाग भांडवल असणाऱ्या सेवा सहकारी संस्था (२८), कर्मचारी, नागरी व ग्रामीण पत संस्था व इतर काही (१६) असा एकूण ५६ आहेत. क गटात- १० लाखांपेक्षा कमी भाग भांडवल असलेल्या सेवा सहकारी संस्था (१२०), लहान पत संस्था (६४), प्राथमिक दुग्ध, मत्स्य, पशुधन सहकारी संस्था (५८) व इतर काही संस्थांचा समावेश असून एकूण २९५ संस्था आहेत. तर ड गटात- २०० पेक्षा कमी सभासद असलेल्या गृहनिर्माण व उपसा, जलसिंचन व पाणी वापर संस्था (२८), मजूर (४२), जंगल कामगार (४) अशा एकूण ७८ संस्था आहेत. जिल्हा उप निबंधक कार्यलयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सहकारी निवडणूक प्राधीकरणच्या आदेशानुसार ३१ आॅक्टोबर २०१४ पूर्वी संचालक मंडळाचा कार्यकाळ संपलेल्या जिल्ह्यातील आठ निवडणुकीस पात्र ठरत असून त्यांच्या निवडणुका पहिल्या टप्यात घेण्यात येणार आहेत. या आठ संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला सुरूवात झाली असून लवकरच त्यांचा निवडणूक कार्यक्रम घोषीत केला जाणार आहे. (शहर प्रतिनिधी)