शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

कर वसुली मोहिमेला इलेक्शन ड्यूटीचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:53 IST

गोंदिया : नगरपरिषद कर विभागाकडून सध्या धडाक्यात वसुलीची मोहीम राबविली जात आहे. यावरून यंदा मालमत्ता कर विभाग रेकॉर्डतोड वसुली ...

गोंदिया : नगरपरिषद कर विभागाकडून सध्या धडाक्यात वसुलीची मोहीम राबविली जात आहे. यावरून यंदा मालमत्ता कर विभाग रेकॉर्डतोड वसुली करणार असल्याचे दिसत आहे. असे असताना मात्र कर विभागाच्या या वसुली मोहिमेला इलेक्शन ड्यूटीचे ग्रहण लागले आहे. कर विभागातील १८ मोहरीलची मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी ड्यूटी लावण्यात आली आहे. यामुळे कर वसुलीवर कोठेतरी परिणाम पडणार आहे.

मालमत्ता कर वसुलीत येणाऱ्या नानाविध अडचणींमुळे मालमत्ता कर विभागाची वसुली होत नाही. परिणामी दरवर्षी थकबाकीचा आकडा वाढतच चालला आहे. यामुळेच यंदा नगरपरिषदेला ११ कोटींच्या घरात कर वसुलीचे टार्गेट आहे. यंदा मुख्याधिकारी करण चव्हाण यांनी कर वसुलीत कुणाचीही गय न करता वसुली अथवा कारवाई असे आदेश दिले आहेत. यामुळे कर वसुली पथक जोमाने कामावर लागले असून धडाक्यात वसुली व सोबतच कराचा भरणा न करणाऱ्यांवर कारवाई करीत आहेत. हेच कारण आहे की, पथकाने आतापर्यंत सुमारे साडेचार कोटींच्या घरात कर वसुली करून घेतली आहे. या धडाक्याने कर वसुली राहिल्यास यंदा नक्कीच रेकॉर्डब्रेक कर वसुली होणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. असे झाल्यास नगरपरिषदेच्या तिजोरीवरील बोजाही कमी होणार आहे. शिवाय दरवर्षी निर्माण होणारी कर वसुलीची डोकेदुखीही नाहीशी होणार आहे. असे असतानाच मात्र कर वसुलीला इलेक्शन ड्यूटीचे ग्रहण लागले आहे. त्याचे असे की, मालमत्ता कर विभागात कार्यरत १८ मोहरीलची मतदार यादी अद्ययावत मोहिमेत ड्यूटी लावण्यात आली आहे. आता मोहरील नसल्यास कर वसुली कशी करावी असा प्रश्न कर विभागाला पडला आहे.

------------------------------

उरणार फक्त ३ कर्मचारी

नगरपरिषद मालमत्ता कर विभागात आजघडीला १८ मोहरील कार्यरत आहेत. या मोहरीलकडेच त्यांच्याकडे असलेल्या वॉर्डातील संपूर्ण माहिती असते. यात १५ स्थायी असून ३ कंत्राटी तत्वावर घेण्यात आले आहेत. आता या १८ मोहरीलची ड्यूटी लावण्यात आल्याने कर विभागात फक्त १ कर अधिकारी व २ सहायक कर अधिकारी उरणार आहेत. अशात कर वसुलीवर परिणाम जाणवणार असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही.

-------------------------------

सन २०२० सर्वात कठीण

सन २०२० मध्ये मार्च महिन्यातच लॉकडाऊन लागले व तेव्हाच शहरात कोरोना रूग्ण आढळून आला होता. तेव्हापासूनच मोहरीलची फसगत सुरू आहे. कोरोना कालावधीत मोहरीलची कोरोना स‌र्वेक्षण, कंटेन्मेंट झोन मध्ये ड्यूटी, जनगणना, पोलीस पंच अशी कामे करावी लागत आहेत. यामुळे कर विभागाच्या कार्यावर याचा परिणाम होत आहे.