शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

योग्य व्यवस्थापनाअभावी पुजारीटोला धोक्यात

By admin | Updated: November 13, 2014 23:04 IST

जिल्ह्यात सिंचनासाठी महत्वपूर्ण ठरलेले पुजारीटोला, कालीसराड व सिरपूर धरण उपविभागीय अधिकाऱ्यांच्या गलथान व्यवस्थापनामुळे जर्जर होत आहे. धरणावरील दुरुस्तीच्या कामातील

आमगाव : जिल्ह्यात सिंचनासाठी महत्वपूर्ण ठरलेले पुजारीटोला, कालीसराड व सिरपूर धरण उपविभागीय अधिकाऱ्यांच्या गलथान व्यवस्थापनामुळे जर्जर होत आहे. धरणावरील दुरुस्तीच्या कामातील निधी घश्यात जात असल्याने धरण परिसराची दुरवस्था होत आहे. धरण व परिसरातील हिरवळ पर्यटकांसाठी आकर्षण असताना आता त्याच जागेवर मद्यपी व जुगाऱ्यांनी कब्जा केल्याचे दिसून येते. त्यामुळे धरण व परिसर सद्यस्थितीत ओल्या पार्टीचे स्थळ म्हणून कुप्रसिद्ध होण्याच्या मार्गावर आहे.जिल्ह्यातील आमगाव, सालेकसा, देवरी या तालुक्यात सिंचन सुविधांसाठी कालीसराड, पुजारीटोला व शिरपूर धरण शेतकऱ्यांसाठी वरदान आहे. शासनाने या धरणांचे योग्य व्यवस्थापन व्हावे यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. धरण परिसराच्या विकासासासाठी अनेक कामे या परिसरात करण्यात आली आहेत. धरण परिसर वनांनी वेढला असल्याने या ठिकाणी वन्यप्राण्यांचे वास्तव्य दिसून येतो. त्यामुळे धरण व या भागातील वनपरिसर पर्यटनस्थळ म्हणून ओळखला जाते. यातूनच येथे पर्यटक नेहमी आकर्षित होत असतात. परंतु कालांतराने या धरण परिसरातील उपलब्ध सोयी जर्जर होत चालल्याने नागरिकही या भागाकडे पाठ दाखवित आहेत.धरणाचे व परिसरातील व्यवस्थापनाची जबाबदारी बाघ इटियाडोह पाटबंधारे व्यवस्थापन उपविभागाकडे आहे. शासन निधीअंतर्गत धरण परिसरात वास्तव्यात असलेल्या इमारती, वृक्षलागवड असलेला बगीचा यात भर घालण्यात आली. धरण परिसरात सौंदर्यीकरणाची भर पडावी यासाठी विविध पावले विभागाने उचलली आहेत. परंतु कालांतराने धरण व परिसर योग्य व्यवस्थापनाअभावी जर्जर होत चालला आहे. वास्तव्यासाठी उपयोगी असलेल्या इमारती, धरण परिसरातील दाराजवळील पूल, बगिचा पूर्णत: जर्जर अवस्थेत पोहोचला आहे. यात धरणावरील पुलावरील सुरक्षा भिंत, पुलावरील मोठी भेगा अपघातांना आमंत्रण देत आहेत. याकडे विभागाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे झाले आहे. धरणाच्या व्यवस्थापनाकरिता प्रशासनाने तत्पर असायला पाहिजे, परंतु धरण व परिसरातील जर्जर व्यवस्थेकडे स्थानिक अधिकाऱ्यांनी पाठ दाखविली आहे.शासनाकडून दरवर्षी धरणाच्या व्यवस्थापनाकरिता निधी आवंटीत करण्यात येत असल्याची माहिती विभागाकडे आहे. सदर निधीचा उपयोग होतच नसल्याचे धरण व परिसरातील वाताहत बघून लक्षात येते. धरण व परिसरातील वाताहतीमुळे पर्यटकांचा उद्देश सध्या मागे पडत आहे. या परिसरात विभागाच्या कामचुकारपणामुळे अवैध व्यवसायाला आता चालना मिळाली आहे. या परिसरातील विश्रामगृहात जुगाराचे अड्डे तर मद्यपींची मैफल नेहमीचे वास्तव्य ठरले आहे. त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने या परिसरात येणाऱ्या नागरिकांनी पाठ फिरविली आहे. धरण व परिसरात एकांतपणा असल्याने प्रेमीयुगलांसाठी मनोमिलनाचे स्थळ ठरले आहे. परिसरात वाढत्या अपराधिक वृत्तीमुळे परिसरात मोठी अनुचित घटना घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. याची विभागाने कोणतीच दखल अद्याप घेतलेली नाही. या विभागाचा पूर्णत: नकारात्मक दृष्टीकोण असल्याने धरण व परिसरातील व्यवस्था पूर्ववत होत नसल्याचे दिसून येते. (शहर प्रतिनिधी)