शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

नाटक हे प्रबोधनाचे माध्यम

By admin | Updated: November 2, 2014 22:38 IST

चित्रपटांची निर्मिती होण्यापूर्वी ग्रामीण भागात गोंधळ, तमाशा, दंडार इत्यादी लोककलांसोबतच नाटकसुध्दा मनोरंजनाचे साधन होते. एवढेच नाही तर कौटुंबिक, सामाजिक व धार्मिक

साखरीटोला : चित्रपटांची निर्मिती होण्यापूर्वी ग्रामीण भागात गोंधळ, तमाशा, दंडार इत्यादी लोककलांसोबतच नाटकसुध्दा मनोरंजनाचे साधन होते. एवढेच नाही तर कौटुंबिक, सामाजिक व धार्मिक नाटकांच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन केले जात होते. आताही इंटरनेटच्या काळात ग्रामीण भागात प्रबोधनाचे महत्वाचे माध्यम म्हणून नाटकाला महत्व आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती सविता पुराम यांनी कवडी येथे ‘दहशत’ या नाटकाच्या उद्घाटनप्रसंगी केले. खास मंडईनिमित्त परिवर्तन नाट्य कला मंडळाच्या वतीने ३० आॅक्टोबर रोजी या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. या नाटकाचे उद्घाटन सविता पुराम यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी एस.आर. रहांगडाले तर रंगमंच म्हणून पूजक वि.आर. सिरसाठ, सरपंच नोहरलाल चौधरी,डॉ. संजय देशमुख, रमेश चुटे, डॉ. अजय उमाटे, प्राचार्य सागर काटेखाये, तंमुस अध्यक्ष नारायण डोंगरे, डॉ. भुवन लांजेवार, डॉ. अनिश अग्रवाल, किशोर रहांगडाले, पोलीस पाटील विलास साखरे, मोहनसिंग बघेल, पंचायत समिती सदस्य संगीता शहारे, छाया रहांगडाले, ममता रहांगडाले, मुकेश नागेंद्र, किसन चकोले, देवराव चुटे, मनोज शरणागत, गुड्डु बिसेन, उपसरपंच सुरजलाल चौधरी, सचिन हेमने उपस्थित होते. तुही दाता, तुही विधाता, मंगलमूर्ती मोरया या धार्मिक गीताने नाटकाला प्रारंभ करण्यात आला. एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाला राजकीय पुढाऱ्यांच्या अत्याचाराला कशाप्रकारे बळी पडावे लागते याची कौटुंबिक कथा दहशत नाटकातून प्रगट करण्यात आली. शेखर पटले सारख्या कसलेल्या कलाकारामुळे नाटकाव्दारे प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन झाले. कार्यक्रमाचे संचालन कमलेश बोपचे यांनी केले. नाटकाचे यशस्वी आयोजनासाठी सुभाष खैरे, देवदास टेंभुर्णीकर, संतोष साखरे, महेंद्र चौधरी, प्यारेलाल चौधरी, महेंद्र कटरे, अनिल बिसेन, अमृतलाल बिसेन, वैभव वालदे तसेच मंडळाच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)