शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

‘लॉ अ‍ॅन्ड आॅर्डर’चा प्रश्न निर्माण होईल असे वागू नका

By admin | Updated: October 1, 2014 23:25 IST

नागरिकांकडून आलेल्या प्रत्येक तक्रारींची दखल घेतली जाईल. त्यासाठी गोळा करणारे कागदपत्र यासाठी पोलिसांना काही वेळ लागतोच. अशा स्थितीत नागरिकांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये,

पो.अधीक्षक मीना : निवडणुकीसाठी पुरेसा बंदोबस्तनरेश रहिले - गोंदियानागरिकांकडून आलेल्या प्रत्येक तक्रारींची दखल घेतली जाईल. त्यासाठी गोळा करणारे कागदपत्र यासाठी पोलिसांना काही वेळ लागतोच. अशा स्थितीत नागरिकांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये, तसेच पोलिसांनी हा प्रश्न निर्माण होईल अशी स्थिती उत्पन्न करू नये, अशी भावना नुकतेच रुजू झालेले पोलीस अधीक्षक शशीकुमार मिना यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीतून व्यक्त केली.समाजात घडलेल्या बहुतांश घटनांची चौकशी सुरूच असताना नागरिकांना पोलिसांनी ते प्रकरण दडपले असावे असेच वाटते. परंतु अनेक प्रकरणांचा तपास करताना अडथळे येतात. आलेल्या तक्रारी खऱ्या आहेत किंवा नाही याचे पुरावे गोळा करण्यासाठी वेळ निघून जातो. यातून लोकांकडून पोलीसांवर प्रकरण दडपल्याचा आरोप केला जातो. याचा फायदा काही समाजकंटक घेवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करतात. राजस्थानमधील वास्तव्यास असलेले शशीकुमार मिना सन २००९ मध्ये भारतीय पोलीस सेवेत दाखल झाले. सन २००९ ते ११ पर्यंत सरदार वल्लभभाई पटेल प्रशिक्षण केंद्र हैद्राबाद येथे प्रशिक्षण घेतल्यानंतर बुलढाणा जिल्ह्याच्या मलकापूर येथे परिवेक्षाधिन पोलीस उपअधीक्षक म्हणून काम पाहिले. तेथे दीड वर्ष काढल्यानंतर मार्च २०१३ मध्ये त्यांना पदोन्नतीवर अतिरिक्त पोलीस अधीक्षक नक्षल अभियान गडचिरोली येथे नियुक्ती देण्यात आली. या ठिकाणीही त्यांनी सप्टेंबर २०१४ पर्यंत म्हणजेच दीड वर्ष काढले. त्यानंतर आचार संहिता लागण्यापूर्वी त्यांनी गोंदिया जिल्ह्याची पोलीस अधीक्षक म्हणून सूत्रे सांभाळली. ते रूजू होताच निवडणुकीचे वारे जोराने वाहू लागल्याने बैठका, पत्रपरिषद आणि लागणारी फोर्स यासंदर्भात ते गुंतून राहिले. गोंदिया जिल्हा नक्षलग्रस्त आहे. गोंदिया जिल्ह्यातील १६ पैकी ६ पोलीस ठाणे व ८ एओपी नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील आहेत. सोबतच मध्यप्रदेशच्या बालाघाट, छत्तीसगडचा राजनांदगाव व महाराष्ट्राचा गडचिरोली जिल्हा गोंदिया जिल्ह्याला लागून असल्याने नक्षलवाद्यांच्या हालचाली मोठ्या प्रमाणात दिसून येते. या हालचालींवर करडी नजर ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी मोठी फोर्स मागविली आहे. इट का जवाब पत्थरसे देंगे. असे त्यांचे मत आहे. यासाठी निमलष्करी दलाच्या मोठ्या प्रमाणात कंपन्या, बटालियन व इतर जिल्ह्यातूनही पोलीस फोर्स मागविण्यात आले आहे. आलेल्या प्रत्येक तक्रारींना आपली पोलीस न्याय देईल, कुणावरही अन्याय होणार नाही, कायदा व सुव्यव्यवस्थेचा प्रश्न उद्धभवू नये यासाठी आपण जातीचे लक्ष घालणार असल्याचे त्यांनी सांगितले. नक्षलग्रस्त भागातील नागरिकांनी निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहनही त्यांंनी केले आहे.