शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
5
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
6
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
7
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
8
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
9
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
10
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
11
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
12
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
13
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
14
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
15
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
16
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
17
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
18
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
19
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
20
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
Daily Top 2Weekly Top 5

कठीण प्रसंगी घाबरू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 05:00 IST

जीवनात सुख-दुख लागले असून कित्येक कठीण प्रसंग येतात. या कठीण प्रसंगांत जो घाबरला तो पुढे जाऊ शकत नाही व तेथेच थांबून राहिल्याने प्रगती होत नाही. याकरिता विद्यार्थ्यांनी कठीण प्रसंगांत घाबरू नये असे प्रतिपादन मुंबईचे डीआयजी हरीश बैजल यांनी केले.

ठळक मुद्देहरीश बैजल : सैनिकी शाळेतील वार्षिकोत्सव उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जीवनात सुख-दुख लागले असून कित्येक कठीण प्रसंग येतात. या कठीण प्रसंगांत जो घाबरला तो पुढे जाऊ शकत नाही व तेथेच थांबून राहिल्याने प्रगती होत नाही. याकरिता विद्यार्थ्यांनी कठीण प्रसंगांत घाबरू नये असे प्रतिपादन मुंबईचे डीआयजी हरीश बैजल यांनी केले.येथील गोंदिया एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित मनोहरभाई पटेल सैनिकी शाळेच्यावतीने आयोजित वार्षिकोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी गोंदिया एज्युकेश्न सोसायटीचे सचिव माजी आमदार राजेंद्र जैन, नमाद महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. चतुर्वेदी, होमीयोपॅथी कॉलेजच्या प्राचार्या डॉ. हर्षा कानतोडे, सैनिकी शाळेच्या मुख्याध्यापिका रुपा मिश्रा, सुबेदार रामगोविंद जगने, सुबेदार कैलाश जांगडे उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व सरस्वती वंदनाने करण्यात आली. पुष्पगुच्छ आणि विद्यार्थ्यानी गायलेल्या स्वागत गीताने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. सैनिकी शाळेच्या विद्यार्थ्यानी परेड करुन सर्वाचे लक्ष केंद्रित केले. पुढे बोलताना बैजल यांनी, विद्यार्थ्यांना आपल्या पालकांना गाडी चालविताना हेलमेट व सीट बेल्टचे महत्व सांगा. त्यांना आत्मग्लानी होऊन नक्कीच ते नियमांचे उल्लंघन करणार नाही असे सांगीतले.मुख्याध्यापिका मिश्रा यांनी आजपर्यंत शाळा व विद्यार्थ्यांनी गाठलेल्या यशाची माहिती मांडली. संस्था सचिव जैन यांनी, विद्यार्थ्यांनी यश प्राप्त करण्यासाठी खूप मेहनत करावी व आपल्या आई-वडिलांचे नावलौकीक करावे असे सांगितले.पश्चात, सांस्कृतीक कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. सैनिकी शाळेत शिक्षण झालेल्या जुन्या विद्यार्थ्यांनी मंचावर आपल्या मुख्याध्यापिका व शिक्षकांसोबत डान्स करुन कार्यक्रमाचा आनंद लुटला. कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्याची सुरुवात होण्यापूर्वी शिक्षक खिलेंद्रगिरी ओंकारी व शिक्षक राजकुमार शेंडे यांनी पालकांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम ठेऊन पालकांनाही त्यात सहभागी करुन घेतले.संचालन बरखा तिहाडे व राजकुमार शेंडे यांनी केले. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Socialसामाजिक