Divyangs should register on the electoral roll | दिव्यांगांनी मतदार यादीत नाव नोंदवावे

दिव्यांगांनी मतदार यादीत नाव नोंदवावे

ठळक मुद्देकादंबरी बलकवडे : सुलभ निवडणुका जिल्हास्तरीय नियंत्रण समितीची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : दिव्यांग व्यक्तीही समाजाचे अभिन्न अंग असून सर्वसामान्यांप्रमाणे त्यांनाही मतदानाचा हक्क बजावण्याचा अधिकार आहे. यामुळे दिव्यांगांनी मतदारयादीत आपले नाव नोंदवावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी केले.
मतदारयादीत नव दिव्यांग मतदारांच्या संख्येत वाढ करण्याच्या अनुषंगाने ‘सुलभ निवडणुका’ जिल्हास्तरीय नियंत्रण समिती गठीत करु न जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी (दि.२१) घेण्यात आलेल्या विशेष बैठकीत अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. पुढे बोलताना डॉ. बलकवडे यांनी, आगामी विधानसभा निवडणूक २०१९ करिता भारत निवडणूक आयोगाने दिव्यांग मतदारांना लोकशाही प्रकियेमध्ये सामावून घेण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दिव्यांग व्यक्तिही समाजाचा अभिन्न अंग असून समाजातील प्रत्येक घटकात त्यांचे समायोजन व्हावे म्हणून निवडणूक प्रक्रि येत त्यांचा महत्त्वाचा सहभाग नोंदविण्याकरीता त्यांनी विधानसभास्तरावर मतदारसंघात बैठक घेण्याचे निर्देश दिले.
दिनांक १ जानेवारी २०१९ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणारी व्यक्ति मतदार म्हणून मतदार यादीत आपल्या नावाची नोंद करण्यासाठी मतदान केन्द्रस्तरीय अधिकारी किंवा संबंधित तहसील कार्यालयात संपर्क करु शकतील. मागील लोकसभा निवडणुकीमध्ये मतदार यादीत तीन हजार १०० दिव्यांग मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली आहे.
भारतीय निवडणूक आयोगाने ‘सुलभ निवडणुका’ हे घोष वाक्य जाहिर केले आहे. त्यानुसार दिव्यांग घटकातील प्रत्येक मतदाराला निवडणूक प्रक्रि येमध्ये समावून घेण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.
या कार्यक्रमात दिव्यांग मतदारांना निवडणूक प्रक्रियेबाबत तसेच त्यांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांबाबत माहिती देण्यात येईल. तसेच येत्या ३१ ऑगस्ट रोजी मतदारयादी प्रसिद्धी करण्यात येणार आहे.
विशेष सोयीसुविधा मिळणार
२१ प्रकारचे दिव्यांगत्व असलेल्या नव मतदारांनी आपले नाव मतदार यादीत दिव्यांग म्हणून नोंदवावे. जेणे करु न निवडणूक आयोगामार्फत व मतदान केंद्रावर उपलब्ध असलेल्या विशेष सुविधांचा लाभ दिव्यांग मतदारांना घेता येईल. तसेच इतर नागरिकांनी दिव्यांग नव मतदारांना ज्यांनी १ जानेवारी २०१९ रोजी १८ वर्षे पूर्ण केली आहे त्यांना मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी प्रवृत्त करावे असेही डॉ. बलकवडे यांनी कळविले आहे. दिव्यांग मतदारांसाठी विशेष सुविधा व मतदान प्रकियेशी संबंधित कायदे नियमासाठी, मतदार यादीत नाव व मतदान केंद्र शोधण्यासाठी, ऑनलाईन मतदार नोंदणी, दुरुस्ती, नाव वगळणे इत्यादिसाठी व तक्र ारींसाठी अ‍ॅपद्वारे मदतीची मागणी करता येईल. सदर अ‍ॅप गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध आहे. अंध मतदार आपले मत देण्यासाठी फॉर्म ४९ (अ) भरुन आपल्यासाठी साथीदाराची मदत घेऊ शकतात.

Web Title: Divyangs should register on the electoral roll

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.