शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

सा.बां.विभागाच्या कारभाराने पंधरवाड्यात तीन अपघात

By admin | Updated: October 16, 2014 23:27 IST

सडक/अर्जुनी तालुक्यातील सडक/अर्जुनी ते शेंडा मार्गावर असलेल्या केसलवाडा वळणावर बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभाराने या पंधरवाड्यात तीन मोठे अपघात घडले. या अपघातातील

वामन लांजेवार - शेंडा कोयलारीसडक/अर्जुनी तालुक्यातील सडक/अर्जुनी ते शेंडा मार्गावर असलेल्या केसलवाडा वळणावर बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभाराने या पंधरवाड्यात तीन मोठे अपघात घडले. या अपघातातील जखमी झालेल्या व्यक्तींना अपंगत्व वाट्याला आले असून वाटसरूंनी संताप व्यक्त केला आहे. सडक/अर्जुनीवरून तीन किमी अंतरावर असलेल्या केसलवाडा (मुनिश्वर टोला) जवळ जीवघेणे वळण असून रस्त्यांच्या दोन्ही कडेला जंगल, झुडपे व उंच गवत वाढलेले आहे. त्यामुळे आमोरसमोरून येणारी वाहने एकमेकांना दिसत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी आतापर्यंत नऊ तर एकाच पंधरवाड्यात तीन मोठे अपघात झाले. या अपघातातील जखमी अपंग झाले आहेत. सुरक्षेच्या दृष्टिने रस्त्याची देखभाल किंवा किंवा डागडुजी करण्यात आली नाही. कडेला वाढलेली झुडपे, अपघातग्रस्त ठिकाणावर वाहने हळू चालवा तसेच धोक्याचे वळण लिहिलेले बोर्ड लावणे यासारख्या कामाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. परंतु याकडे सडक/अर्जुनीपासून शेंडा गावापर्यंत पूर्णत: दुर्लक्ष करून सार्वजनिक बांधकाम विभागाने आपल्या कर्तबगारीचा परिचय देवून उच्चांक गाठला आहे. मागील आठवड्यात सोमवारी दुपारी ३.३० वाजता सदर लोकमतचे वार्ताहर वामन लांजेवार हे सडक/अर्जुनी येथे येत असताना याच वळणावर समोरून येणाऱ्या आॅटोच्या जबर धक्क्याने पत्नीसह जखमी झाले. त्यांच्या उजव्या पायाला तीन ठिकाणी फ्रॅक्चर झाल्याने ते अपंगच झाले आहेत. याला जबाबदार कोण?त्याचप्रमाणे सडक/अर्जुनीच्या बाजार चौकात आॅटो चालक १५ ते २० प्रवासी भरूनच दिवसभर शेंडा ते सडक/अर्जुनी मार्गावर चालतात. कधीकधी चालकाला बसायला जागा राहत नाही व तो वाहनावर ताबा ठेवू शकत नाही, असे अनेकदा पहायला मिळते. बाजाराच्या दिवशी तर परिस्थिती बिकटच असते. हा सर्व प्रकार पोलीस वर्दीवर राहून उघड्या डोळ्याने ते खांबासारखे उभे राहून बघतात. परंतु हप्ता वसुलीसाठी कोणतीच कारवाई करीत नाही, असा आरोप नागरिकांचा आहे. सडक/अर्जुनी ते शेंडा मार्गावर अपघातांना आमंत्रण देणारी अनेक वळणे आहेत. परंतु संबंधित विभागाचे अधिकारी त्याकडे ढुंकूनही पाहत नाही. आतापर्यंत नऊ अपघात व सध्या एकाच पंधरवाड्यात तीन जबर अपघात घडूनही अधिकारी मुंग गिळून गप्प का? हा प्रश्न वारंवार निर्माण होत आहे. नुसत्या वेतनासाठीच ते उपस्थिती दाखवत असल्याचा आरोपही नागरिक करीत आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून त्वरीत रस्त्याच्या दोन्ही बाजूंची सफाई करण्यात यावी. जेणेकरून अपघात टाळता येतील. अन्यथा अपघातग्रस्तांना न्याय मिळेपर्यंत व नुकसान भरपाई मिळेपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर ठेवण्यात येईल, त्यांना इतरत्र हलविण्यात येणार नाही, असे वाहतूकदारांनी ठणकावून सांगितले आहे.