शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
3
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
4
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
5
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
6
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
7
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
8
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
9
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
10
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
11
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
12
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
13
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
14
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
15
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
16
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
17
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
18
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
19
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
20
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
Daily Top 2Weekly Top 5

‘दिशा’ने दिली ३९५ महिलांना दिशा

By admin | Updated: October 24, 2015 01:44 IST

वाढत्या शैक्षणिक सुविधांसह समाजाच्या स्थितीतही सुधारणा होणे अपेक्षित आहे, परंतु समाजाच्या विचारसरणीत अजूनही विशेष परिवर्तन झालेले नाही.

महिला हिंसाचारात वाढ : समुपदेशन केंद्राला पोलिसांचे बळ नाहीचदेवानंद शहारे गोंदियावाढत्या शैक्षणिक सुविधांसह समाजाच्या स्थितीतही सुधारणा होणे अपेक्षित आहे, परंतु समाजाच्या विचारसरणीत अजूनही विशेष परिवर्तन झालेले नाही. कौटुंबिक हिंसाचार वाढतच आहे. जिल्ह्यात हुंड्यासाठी होणाऱ्या छळासह मारहाण व लैंगिक शोषणाच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. स्थानिक दिशा संस्थेने यावर आळा घालून महिलांवरील तंटांच्या प्रकरणात समेट घडवून आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यातून महिला अत्याचाराशी संबंधित ४८७ प्रकरणांपैकी ३९५ प्रकरणांचा निपटारा दिशा महिला समुपदेशन केंद्राने केला आहे.यात डझनभर प्रकरणात योग्य मार्गदर्शन मिळाल्यामुळे ते कुटुंब तुटण्यापासून वाचले. मात्र पोलीस विभागाद्वारे चालविण्यात येणाऱ्या महिला सहायता सेलमध्ये येणाऱ्या प्रकरणांच्या संख्येचा यात समावेश करण्यात आलेला नाही. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास आयुक्तालय व पोलीस महासंचालक कार्यालयाच्या माध्यमाने राजगीरी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेद्वारे दिशा महिला समुपदेशन केंद्र (तक्रार निवारण) गोंदिया शहर पोलीस ठाण्यात चालविण्यात येत आहे. या केंद्रात कौटुंबीक भांडण, महिलांवर होणारे अत्याचार, हुंडा, महिलांच्या अधिकारांसाठी बनलेल्या कायद्यासंदर्भात मार्गदर्शन केले जाते. अशाचप्रकारे महिलांच्या विविध तक्रारी, हुंडाबळी प्रकरण, कौटुंबीक वाटपाची समस्या, घरगुती समस्या, महिलांवर होणारे अत्याचार, घरून बाहेर निघून धमकी देणे, मारहाण, सोडचिठ्ठी व भरण-पोषण, संपत्तीचा अधिकार, लैंगिक शोषण, अतिप्रसंग आदी प्रकरणांत महिलांना न्याय मिळवून देणेसुद्धा केंद्राचे कार्य आहे.कौटुंबिक हिंसाचाराची सर्वाधिक २९२ प्रकरणे१ सप्टेंबर २०१० पासून सुरू असलेल्या दिशा महिला सहायता केंद्रात सप्टेंबर २०१५ पर्यंत ४८७ प्रकरणे निपटाऱ्यासाठी आली. त्यात सर्वाधिक २९२ प्रकरणे कौटुंबिक हिंसाचाराशी संबंधित आहेत. यानंतर ७९ प्रकरणे हुंड्याशी संबंधित होते. अशाच प्रकारे सोडचिठ्ठीचे ५०, वैवाहिक समस्या ४२, संपत्ती २८, भरण-पोषण २३, लैंगिक समस्येचे १८ व इतर प्रकारची १५ प्रकरणेसुद्धा केंद्रात निपटाऱ्यासाठी आली.१९ टक्के प्रकरणे प्रलंबितकेंद्रात आपसी तडजोड व मार्गदर्शनासाठी आलेल्या ४८७ प्रकरणांपैकी ३९५ प्रकरणे समन्वयाने सोडविण्यात आली. मात्र ९२ प्रकरणांचा अद्यापही निपटारा होवू शकला नाही. कौटुंबिक हिंसाचाराची १३ प्रकरणे न्यायालयात दाखल करण्यात आली आहेत. बाल शोषणाच्या तीन प्रकरणांना बाल संरक्षण अधिकारी कार्यालयात हलविण्यात (रेफर) आले. पोलिसांकडून सहकार्य मिळत नाहीदिशा समुपदेशन केंद्रात आलेल्या लैंगिक शोषण, हुंड्यासाठी छळ, मारहाण, संपत्ती अधिकार यासारख्या प्रकरणांत या केंद्राला संरक्षणासाठी अनेकदा पोलिसांची गरज पडते. परंतु पोलिसांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नाही. त्यामुळे केंद्रात कार्यरत कर्मचाऱ्यांना समस्येचा सामना करावा लागतो. अशाप्रकारे महिला हिंसाचाराशी संबंधित प्रकरणांनासुद्धा समुपदेशन केंद्रात पाठवायला हवे, परंतु समुपदेशन केंद्रात ती प्रकरणे पोलिसांकडून हलविली (रेफर) जात नाहीत.