शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

रॅपिड अँटीजन तपासणीतून कोरोनाचे निदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 05:00 IST

रॅपिड अँटीजन टेस्ट किटच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीचे स्वॅब नमुने घेऊन केवळ १५ ते ३० मिनिटांत अहवाल प्राप्त होतो. अहवाल पॉझिटिव्ह आल्यास व्यक्ती कोरोना बाधित आहे असे गृहीत धरुन त्या व्यक्तीवर उपचार केले जातात. व्यक्तीमध्ये आजाराची लक्षणे असून अहवाल निगेटिव्ह आल्यास संबंधित व्यक्तीचे पुन्हा स्वॉब नमुने घेऊन चाचणी प्रयोगशाळेत पाठविले जातात.

ठळक मुद्देकादंबरी बलकवडे : कुंभारेनगर येथे प्रायोगिक तत्वावर : काही मिनिटात होणार निदान

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिह्यात कोरोना संक्र मणा विरूद्धचा लढा अधिक सशक्त व्हावा याकरिता तातडीने रॅपिड अँटीजन तपासणीच्या माध्यमातून कोरोना संशयितांचे त्वरित निदान होण्यास मदत होणार आहे, असे मत जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी व्यक्त केले.जिल्हाधिकारी कार्यालयात या अनुषंगाने नुकतीच बैठक आयोजित करण्यात आली असता यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीला अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भूषणकुमार रामटेके, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. नितीन कापसे, डॉ.प्रशांत तुरकर, समाज कल्याणचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे उपस्थित होते. डॉ. बलकवडे म्हणाल्या, कोरोना संशयितांचे त्वरीत निदान करण्यासाठी जिल्ह्या रॅपिड तपासणी प्रक्रिया नुकतीच सुरू करण्यात आली आहे. पथदर्शी प्रकल्प म्हणून गोंदिया शहरातील कुंभारेनगर येथे ही तपासणी सुरू करण्यात आली आहे. कोरोनाच्या संशियत रुग्णांच्या प्राथमिक तपासणीकरीता टेस्ट किट अत्यंत उपयोगी आहे. या चाचणीचा अहवाल केवळ ३० मिनिटांत उपलब्ध होतो. त्यामुळे प्रशासनाला जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी तातडीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यास मदत होणार आहे. रॅपिड अँटीजन तपासणीकरिता सारी, आय.एल.आय, मधुमेह, उच्च रक्तदाब यासारखे आजार त्याचप्रमाणे कायमस्वरुपी असणारे आजार, गर्भवती महिला, ६० वर्षावरील व्यक्ती, तसेच कोरोना संशयीतांची तपासणी रॅपिड अँटीजन किटच्या माध्यमातून करता येणार आहे. रॅपिड अँटीजन टेस्टमधून संशयित व्यक्ती हा कोरोना बाधित असल्याचे निदान झाल्यास त्याच व्यक्तीला कोविड केअर सेन्टर अथवा संस्थात्मक विलिगकरण कक्षात दाखल करुन उपचार करण्यात येईल. जर व्यक्तीच्या टेस्टचा अहवाल निगेटिव्ह आला तर त्या व्यक्तीला घरी जाता येईल. तरी कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांनी न घाबरता आपली कोरोना रॅपिड अँटीजन चाचणी करण्यास पुढे यावे. त्यामुळे कोरोना संसर्ग रोखण्यास मदत होणार आहे. शस्त्रक्रिया, आपातकालीन आरोग्य प्रकरणे व कंटेन्मेट झोनमधील नागरिकांना यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.अर्ध्या तासात प्राप्त होतो अहवालरॅपिड अँटीजन टेस्ट किटच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीचे स्वॅब नमुने घेऊन केवळ १५ ते ३० मिनिटांत अहवाल प्राप्त होतो. अहवाल पॉझिटिव्ह आल्यास व्यक्ती कोरोना बाधित आहे असे गृहीत धरुन त्या व्यक्तीवर उपचार केले जातात. व्यक्तीमध्ये आजाराची लक्षणे असून अहवाल निगेटिव्ह आल्यास संबंधित व्यक्तीचे पुन्हा स्वॉब नमुने घेऊन चाचणी प्रयोगशाळेत पाठविले जातात. साधारणत: स्वॅब नमुने प्रयोगशाळेत पाठविल्यानंतर २४ ते ४८ तासांत अहवाल प्राप्त होत असून यामुळे बराच वेळ जातो. परंतु रॅपिड अँटीजन तपासणीच्या माध्यमातून अवघ्या ३० मिनीटांत अहवाल प्राप्त होत असल्यामुळे प्रशासनाला जिल्ह्यात कोरोना संक्र मण रोखण्यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना करण्यास मदत मिळणार आहे. जिल्ह्यातील इतर सर्व कंटेन्मेंट झोनमध्ये यापुढे रॅपिड अँटीजन टेस्टची सेवा सुरु केली जाणार आहे.या ठिकाणी तपासणीची सुुविधाजिल्ह्यातील फिवर क्लीनिक, केटीएस जिल्हा सामान्य रु ग्णालय गोंदिया, जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रु ग्णालय या ठिकाणी तपासणीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गोंदिया येथील कुंभारेनगर येथील कंटेन्मेंट झोनमध्ये रॅपिड अँटीजन तपासणी १४ जुलैपासून पथदर्शी प्रकल्प म्हणून सुरू करण्यात आली आहे. या ठिकाणी १५ जुलैपर्यंत एकूण ७५ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. सर्व अहवाल निगेटीव्ह आले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारी