शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण परिसरात होणार ३५ कोटींची विकास कामे

By admin | Updated: March 18, 2016 02:05 IST

गोंदिया तालुका काँग्रेस कमेटीच्यावतीने कामठा-बिरसोला जि.प. क्षेत्र व पांजरा-काटी पंचायत समिती क्षेत्रांतर्गत काँग्रेस ..

गोंदिया : गोंदिया तालुका काँग्रेस कमेटीच्यावतीने कामठा-बिरसोला जि.प. क्षेत्र व पांजरा-काटी पंचायत समिती क्षेत्रांतर्गत काँग्रेस कार्यकर्तांची विशेष सभा आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी मार्गदर्शन करताना अग्रवाल यांनी आज राज्यात विरोधकांची सत्ता असली तरी गोंदिया विधानसभा क्षेत्राच्या सर्वांगिण विकासाकरिता आपले प्रयत्न सुरु असून चालू वित्तीय वर्षात ३५ कोटी रुपयांच्या विकास कामांचा ग्रामीण परिसरात शुभारंभ करणार असल्याचे सांगितले.पुढे बोलताना आ.अग्रवाल म्हणाले की, कामठा-नवरगाव येथे २ कोटी रुपये किमतीचा पूल, खातीया-बटाना येणारे महत्वपूर्ण बंधारे एप्रिल महिन्यापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे कामठा ते खातीया मार्ग चौडीकरणकरिता २ कोटी रुपये, खातीया पाणघाटकरिता २७ लक्ष रुपये, रावणवाडी ते गर्रापर्यंत निर्माण कार्य, ३ कोटी रुपये किमतीचे दलित वस्ती योजनेअंतर्गत कामांना पालकमंत्री तथा लेखाशिर्ष योजनेअंतर्गत मुख्यमंत्र्यांनी मंजूरी दिली आहे. अर्जुनी-चारगाव-बटाना मार्गाचे निर्माण कार्य, त्याचप्रमाणे ग्रामीण परिसरातील स्मशान शेड, ग्राम पंचायत भवन, अंगणवाडीचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. कामठा-सावरी-अर्जुनी पर्यंतचा उर्वरित मार्गही लवकरच पूर्ण होणार आहे. अशी अनेक विकास कामे ३५ कोटी रुपयांतून करण्यात येणार आहेत. अनेक कामांचा प्रारंभ झाला असून उर्वरित कामे लवकरच प्रारंभ होणार आहेत. यामुळे ग्रामीण युवकांना रोजगार देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे, असे ते म्हणाले. या सभेचे संचालन काँग्रेसचे महासचिव अपूर्व अग्रवाल यांनी केले.