शेतकऱ्यांच्या लाईफ लाईनकडे विभागाची डोळेझाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 05:00 AM2020-07-10T05:00:00+5:302020-07-10T05:00:30+5:30

महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश शासनाच्या संयुक्त प्रयत्नाने १९७१ मध्ये तयार करण्यात आलेल्या पुजारीटोला धरणातून गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा, आमगाव आणि गोंदिया तसेच बालाघाट जिल्ह्यातील लांजी व किरणापूर तालुक्यातील एकूण ३१ हजार हेक्टर शेतीला सिंचनाची सोय केली जाते. सिरपूर आणि कालीसरार धरणाच्या मदतीने या धरणाद्वारे पाच ही तालुक्यांना उन्हाळी पिकासाठी पाणी पुरवठा केला जातो.

The department's eye on the farmer's life line | शेतकऱ्यांच्या लाईफ लाईनकडे विभागाची डोळेझाक

शेतकऱ्यांच्या लाईफ लाईनकडे विभागाची डोळेझाक

Next
ठळक मुद्देसहा महिन्यापासून वीज पुरवठा खंडित : निरीक्षण कक्ष झाले खंडार,निधीची प्रतीक्षा

विजय मानकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : गोंदिया आणि बालाघाट जिल्ह्यातील हजारो गावांची लाईफलाईन असलेल्या सालेकसा तालुक्यातील वाघ नदीवरील पुजारीटोला धरणाची सुरक्षा व्यवस्था वाºयावर असल्याचे चित्र आहे. या धरण क्षेत्राचा विद्युत पुरवठा मागील सहा महिन्यांपासून खंडित असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश शासनाच्या संयुक्त प्रयत्नाने १९७१ मध्ये तयार करण्यात आलेल्या पुजारीटोला धरणातून गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा, आमगाव आणि गोंदिया तसेच बालाघाट जिल्ह्यातील लांजी व किरणापूर तालुक्यातील एकूण ३१ हजार हेक्टर शेतीला सिंचनाची सोय केली जाते. सिरपूर आणि कालीसरार धरणाच्या मदतीने या धरणाद्वारे पाच ही तालुक्यांना उन्हाळी पिकासाठी पाणी पुरवठा केला जातो. या धरणाच्या भरवशावर काही गावांना पिण्याच्या पाण्याचा सुध्दा पुरवठा केला जातो. एवढ्या महत्त्वपूर्ण धरणाच्या देखभाल दुरूस्तीकडे मात्र संबंधित विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. सालेकसा तालुक्याच्या कोटरा ग्रामपंचायत परिसराच्या हद्दीत असलेला पुजारीटोला धरण कोटरा गावाजवळ वाघनदीवर तयार करण्यात आला आहे. याला कोटरा डॅम म्हणून सुध्दा ओळखले जाते. या धरणातून दोन मोठे कालवे काढण्यात आले आहे. एक कालवा सालेकसा तालुक्यात जवळपास १९ किमीचा आहे. तालुक्यातील शेतीला सिंचन करीत पुढे मध्यप्रदेशात प्रवेश करुन बालाघाट जिल्ह्याच्या लांजी, किरणापूर तालुक्यातील मोठ्या भूभागातील शेतीला सिंचनाची सोय केली जाते. तर दुसºया कालव्याच्या मदतीने सालेकसा, आमागव, गोंदिया तालुका परिसरातील शेतीला सिंचनाची सोय करुन देणारा ठरतो. याशिवाय या धरणातून वाघनदीला पाणी सोडून नदीकाठावरील अनेक गावांची तहान भागविली जाते. अशा महत्त्वाच्या धरणाला सुरक्षित ठेवून व्यवस्थितरित्या चालविण्याची संयुक्त जवाबदारी दोन्ही राज्याची आहे. पंरतु दोन्ही राज्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. हा भाग नक्षलग्रस्त भागामध्ये मोडत असून या धरणावरील वीज पुरवठा खंडीत आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळेस या परिसरात जाणे धोक्याचे झाले आहे. चौकीदारांना सुध्दा येथे राहण्यास भीती वाटत असल्याचे सांगितले.

८२ हजाराचे वीज बिल थकीत
पुजारीटोला धरणाचे दरवाजे उघडण्यासाठी व बंद करण्यासाठी मोटारपंप लावण्यात आले आहे. त्या चालविण्यासाठी सतत विजेची गरज असते. तसेच सुरक्षेच्या दृष्टीकोनातून धरण परिसर व वसाहतीमध्ये प्रकाश व्यवस्था आवश्यक आहे. यासाठी मागील अनेक वर्षापासून वापरात असलेल्या विजेच्या बिलाची रक्कम भरण्यात आली नाही.८२ हजार रुपयांचे वीज बिल थकीत असल्याने महावितरणे येथील विद्युत पुरवठा खंडीत केला आहे.

दरवाजे उघड्यासाठी स्टॅन्ड बाय जनरेटर
विद्युत पुरवठा खंडीत असल्याने धरणाचे दरवाजे उघडण्यासाठी व बंद करण्यासाठी स्टॅन्डबाय जनरेटरचा वापर केला असतो. पावसाळ्यात अनेकवेळा आपातकालीन परिस्थिती निर्माण होत असून रात्री बेरात्री दरवाजे उघडण्याची वेळ येते अशात वीज पुरवठा खंडीत असणे धोक्याचे ठरु शकते.

वीज बिलाची रक्कम भरुन विद्युत पुरवठा सुरळीत व्हावा म्हणून वरिष्ठांकडे निधीची मागणी करण्यात आली आहे. परंतु अद्यापही निधी प्राप्त झाला नसल्याने विद्युत बिल भरण्यात आले नाही. परिणामी विद्युत पुरवठा सुरळीत झाला नाही.
- प्रियम शुभम, उपविभागीय अभियंता पाटबंधारे विभाग सालेकसा.

Web Title: The department's eye on the farmer's life line

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.