शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याध्यापिकेला हटविण्याची मागणी

By admin | Updated: November 15, 2014 01:45 IST

महाराष्ट्राच्या अंतिम सीमेवर असलेल्या अतिदुर्गम क्षेत्रातील ककोडी गावातील जि.प.हायस्कूल येथे कार्यरत असलेल्या मुख्याध्यापक रेखा ठवरे ....

देवरी : महाराष्ट्राच्या अंतिम सीमेवर असलेल्या अतिदुर्गम क्षेत्रातील ककोडी गावातील जि.प.हायस्कूल येथे कार्यरत असलेल्या मुख्याध्यापक रेखा ठवरे यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध ककोडीवासी व शाळा व्यवस्थापन समितीने त्यांना तत्काळ हटविण्याची मागणी केली आहे.सविस्तर असे की, रेखा ठवरे या जि.प. हायस्कुल ककोडी येथे मागील काही वर्षापासून कार्यरत आहेत. परंतु शाळेचे प्रशासकिय व आर्थिक व्यवहार पूर्ण करण्याकरीता प्रत्येक शाळेत शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. परंतु या समितीला विश्वासात न घेता मुख्याध्यापिकेने आर्थिक प्रशासकीय व्यवहारात घोळ केल्याची तक्रार ग्रामवासी व शाळा व्यवस्थापन समितीने दि. ७/२/२०१४ ला मुख्य कार्यपालन अधिकारी व शिक्षणाधिकारी गोंदिया यांच्याकडे केली होती. त्यावर दि. २/४/२०१४ ला या प्रकाराची चौकशी करण्याकरीता काही अधिकारी आले होते. त्या अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांचे बयान लिहून नेले व कारवाई करण्याचे गावकऱ्यांना आश्वासन दिले. परंतु ९ महिन्यांचा कालावधी लोटूनसुद्धा कारवाई झालेली नाही. त्यावर पुन्हा ग्रामवासियांनी दि. ३०/९/२०१४ ला सीईओ गोंदिया यांना पुन्हा पत्र देऊन लवकर कारवाई करण्याची विनंती केली आहे.ग्रामवासियांनी निवेदनात म्हटले आहे की, मागील दोन वर्षापासून या शाळेत इंग्रजी व विज्ञान विषयाचे शिक्षक नाही. शाळेचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आलेला आहे. त्यामुळे संगणक शोभेची वस्तू बनलेले आहेत. शाळेचे वेळापत्रक अद्याप बनविण्यात आलेले नाही. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व ककोडी जि.प. क्षेत्राचे सदस्य संदीप भाटिया यांच्याशी चर्चा केली असता भाटीया म्हणाले की, ग्राववासियांना सोबत घेऊन गोंदिया येथे सीईओ व शिक्षणाधिकाऱ्यांनी यापुर्वी दोन वेळा चर्चा करण्यात आलेली आहे. सीईओनी शिक्षकांची पुर्तता करण्याची व मुख्याध्यापिकेला हटविण्यासंबंधीचे आश्वासन दिलेले आहे. जर ही मागणी अधिकाऱ्यांनी पुर्ण केली नाही तर ग्रामवासियांसोबत जि.प. च्या विरोधात आंदोलन छेडले जाईल, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)